
बाभुळगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा….
बाभुळगांव येथील जुगार अड्डयावर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,२८ जुगारींना ताब्यात घेऊन एकुन ३३,३१,४००/- रु चा मुद्देमाल केला जप्त…….
बाभुळगाव(यवतमाळ प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ०२/०६/२०२४ रोजी रात्री चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील पथक हे रात्रगस्त पेट्रोलींग करीत असताना गोपणीय माहिती मिळाली की, पोलिस स्टेशन बाबुळगाव येथील बसस्थानक पासुन गावात जाणाऱ्या मुख्य रोडवरील महालक्ष्मी
हार्डवेअरच्या पाठी मागे राहणारा सचिन वाघमारे हा त्याचे राहते घरी जुगार खेळ खेळवीत आहे.


अशा खात्रीशीर खबरे वरुन तात्काळ पथकाने वरिष्ठांच्या परवानगीने त्यांच् आदेशानुसार सदर ठिकाणी छापा कारवाई करणे करीता रवाना होवून बाभुळगांव येथील सचिन वाघमारे यांचे राहते घरी जुगार संबधाने छापा कारवाई केली असता सचिन वाघमारे यांचे राहते घरात आरोपी १) पुरूषोत्तम विठुमल सरडेचा वय ७३ वर्षे, रा. भारतीय कॉलनी, अमरावती २) हर्षल रमेशराव भुजात्रे वय २५ वर्षे, रा. तळेगांव शामजी पंत ता. आष्टी जि.वर्धा, ३) हिमांशु ऊर्फ मोनू विरेन्द्र बढाये वय २२ वर्षे, रा. करळगांव ता. बाभुळगांव, ४) प्रविण बाबाराव उईके वय ४३ वर्षे, रा.भांबराजा ता. यवतमाळ, ५) फैयाज शहा हाफीज शहा वय ३४ वर्षे, रा. अशोक नगर अकोट फैल अकोला ६) मोहम्मद शहेबाज शेख महेमुद पटेल वय ४६ वर्षे रा. कु-हा ता. तिवसा जि.अमरावती, ७) राम जेठामल मोटवाणी वय २४ वर्षे रा. कु-हा रोड चांदुर रेल्वे जि.अमरावती, ८) ललकारसिंग विजयसिंग टाक वय २५ वर्षे रा. तळेगांव शामजी पंत ता. आष्टी जि.वर्धा, ९) रहीम खान हुसेन खान वय ५० वर्षे रा. किल्याजवळ जुने शहर अकोला १०) इम्रान खान शम्मी खान वय ३३ वर्षे रा. किल्याजवळ जुने शहर अकोला, ११) इम्रान खान
शौकत खान वय २५ वर्षे रा. मोरकेवाडी अकोला, १२) मोहम्मद इम्रान मोहम्मद जाफर वय ४३ रा. चमेडीया लेआऊट यवतमाळ, १३)जावेद शहा हुसेन शहा वय २१ वर्षे रा. अन्नाभाउ साठे चौक अकोट फैल अकोला, १४) मुजाहीद शहा शब्बीर शहा वय ३२ वर्षे रा. सुभाष चौक आकोला, १५) हाफीज खान खेरुउल्ला खान पठाण वय ३५ वर्षे रा. आलेगांव ता. बाभुळगांव, १६) शेख अस्लम शेख सुभान वय ३० वर्षे रा. कॉटनमार्केट यवतमाळ १७) जगत गोपालदास मोटवाणी वय ४५ वर्ष रा. कु-हा रोड चांदुर रेल्वे जि. अमरावती, १८) उमेश मधुकरराव इंगळे वय ४३ वर्ष रा. मिलींद नगर चांदूररेल्वे जि. अमरावती, १९) शेख इम्रान शेख लुकमान वय ३५ वर्ष रा.सारस्वत ले आउट यवतमाळ, २०) सलमान खान बाबाखान पठाण वय ३२ वर्ष रा. नेहरू नगर बाभुळगांव, २१) गजानन तुकाराम राठोड वय ४२ वर्ष रा.पिप्री ता. जि. यवतमाळ, २२)अफसर साहेबजी पठाण वय ३२ वर्ष रा.यादव नगर चांदुर रेल्वे जि. अमरावती,२३ ) योगेश अरूण केणे वय ३३ वर्ष रा. सरदार चौक चांदूररेल्वे अमरावती, २४) नयन विनायकराव चिव्हाणे वय ३४वर्ष रा. आर्दश नगर यवतमाळ, २५) सचिन घनशामदास लोया वय ४५ वर्ष रा. गांधीचौक चांदुर रेल्वे जि. अमरावती, २६) शेख फिरोज शेख सुलतान वय ३३ वर्ष रा. गोल्डन पार्क यवतमाळ, २७) सुरज किशोर सारवन वय ३५ वर्ष रा. शिवाजी नगर अकोला, २८) सचिन प्रभाकर
वाघमारे वय ३६ वर्ष रा. महाविर नगर बाभुळगांव जि. यवतमाळ,

हे सर्व एक्का बादशहा नावाचा हारजितचा जुगार खेळ खेळतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे अंगझडती व डावावरील रोख ९,२६,००० /- रुपये तसेच २६ नग मोबाईल फोन व ०४ चारचाकी वाहने असा एकुण ३३,३१,४००/- रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपीतांकडे अधिक चौकशी केली असता सदरचा जुगाराचा अड्डा हा सचिन प्रभाकर वाघमारे वय ३६ वर्ष रा. महाविर नगर बाभुळगांव हा चालवित असल्याचे सांगीतले आहे. वरील नमुद सर्व आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन बाभुळगांव येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक, डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पो. नि. स्थागुशा, सपोनि विवेक देशमुख, पोउपनि धनराज हाके, सफौ बालाजी ठाकरे, बंडु डांगे, सैय्यद साजीद, पोहवा राहुल गोरे, अजय डोळे, रुपेश पाली, निलेश राठोड, रितुराज मेडवे सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


