
अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
यवतमाळ येथे अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची, NDPS कायदया अंतर्गत कारवाई,11 किलो गांजासह एकास घेतले ताब्यात….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच नाउघड गुन्हे, आरोपी शोध, तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी व विक्री यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करुन त्यावर आळा घालण्याबाबत सुचना दिल्या होत्या


त्यानुसार दि 16 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ कॅम्प परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्याना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलिस स्टेशन यवतमाळ शहर हददीतील अलकबीर नगर यवतमाळ येथे राहणारा एक इसम हा आपले राहते घरी गांजा अंमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात बाळगुन विक्री करीत आहे. अशा प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन अलकबीर नगर यवतमाळ येथे छापा टाकुन समशेर खान ऊर्फ गुडडू सरदार खान वय 29 वर्ष रा. अलकबीर नगर, यवतमाळ यास ताब्यात घेवून त्याचे राहते घरातून विक्री करीता असलेला 11 किलो 052 ग्रॅम गांजा, मोबाईल असा एकूण किमत 2.37,380/- रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला तसेच नमुद आरोपीविरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 20(b) (2) (B), 29 अन्वये अपराध क्रमांक 40/2025 प्रमाणे पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. कुमार चिंता,अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलिस अधिकारी,यवतमाळ दिनेश बैसाने, पोलिस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात सपोनि सुगत पुंडगे, पोउपनि गजानन राजमल्लु, सफौ बंडु डांगे,सै. साजिद,योगेश गटलेवार, पोहवा अजय डोळे, रुपेश पाली, विनोद राठोड,प्रशांत हेडाऊ, रितुराज मेडवे, पोशि सलमान शेख,आकाश सहारे,देवेंद्र होले, आकाश सुर्यवंशी, मपोहवा अरुणा भोयर, चापोहवा योगेश टेकाम,विवेक पेठे सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



