
यवतमाळ येथील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा,लोहारा पोलिस व स्थागुशा पथकाची संयुक्तिक कामगिरी….
वैभवनगर लोहारा परीसरातील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व लोहारा पोलीसांचा छापा,मुख्य महीला सुत्रधारास अटक….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक पवन बन्सोड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/03/2024 गस्तीवर असतांना गोपनीय बातमीदारांकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, महिला नामे निता अनिलराव पिसे हि वैभव नगर लोहारा हिचे राहते दुमजली घरात स्वत:च्या फायदया करीता महीलांकडुन अवैद्य देह विक्रीचा व्यवसाय चालवुन छुप्या पध्दतीने कुंटनखाना चालवित आहे अशा माहीती वरुन सदर ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदया अंतर्गत कार्यवाही करणे आवश्यक असल्याने पोलिस निरीक्षक लोहारा यशोधरा मुनेश्वर, लोहारा पो.स्टे. अधिकारी अंमलदार व स्था. गु.शा पथकातील अधिकारी अंमलदार यांचे सह छापा कारवाईची
संपुर्ण तयारी करुन माहीती प्रमाणे छापा कारवाई करणे करीता बनावट ग्राहक तयार करुन त्यास ठराविक रक्कम देवुन वैभव नगर
लोहारा येथील कुंटनखाना चालविण्याऱ्या निता पिसे या महीलेस वेश्या गमनाकरीता महीलेची मागणी करणे बाबत कळवुन
पाठविले ठरल्या प्रमाणे बनावट ग्राहकाने ईशारा केला नंतर सदर ठिकाणी छापा टाकला असता माहीती प्रमाणे घराचे वरच्या मजल्या वरील एका खोलीत बनावट ग्राहका सह एक महीला मिळुन आली.


नमुद पिडीत व आरोपीचे अंगझडतीत एकुण 600 रु नगदी, जुना वापरता मोबाईल किं. 1000 रु दोन नग निरोध पाकीट 20 /रु असा एकुण 1,620 रु चा मुद्देमाल मिळुन आला. महीला आरोपी निता अनिलराव पिसे वय 42 वर्षे रा. वैभव नगर लोहारा हिने नमुद ठिकाणी मिळुन आलेल्या पिडीत महिलेस फुस लावुन स्वतःच्या फायदयाकरीता वैश्याव्यवसायास प्रवृत्त केले असल्याने पो.स्टे. लोहारा येथे सदर प्रकरणी निता अनिलराव पिसे वय 42 वर्षे रा. वैभव नगर लोहारा हिचे विरुध्द पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पवन बन्सोड,अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप,पोलिस निरीक्षक स्थागुशा आधारसिंग सोनोने,पोलिस निरीक्षक लोहारा यशोधरा मुनेश्वर, मसपोनि निलीमा सातव, स्थागुशा यवतमाळ,पथकातील सपोनि सुगत पुंडगे, पोउपनि धनराज हाके, सफौ योगेश गटलेवार, पोहवा विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ,मपोहवा अरुणा भोयर, नापोशि ममता देवतळे, मपोशि मंजुश्री, पो.शि. आकाश सहारे यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली



