
बाभुळगाव येथील खुनाचा १२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा….
१२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला खुनाचा गुन्हा,आरोपी अटकेत…..
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५ एप्रिल २०२५ रोजी पोलिस स्टेशन बाभूळगांव येथे सैयद मनसंब सैयद रउफ रा. शिवाजी चौक बाभुळगांव यांने तक्रार दिली की, दि १४ रोजी त्याचा लहान भाऊ सैयद नाजीम सैयद रउफ वय ४० वर्षे रा. मिटणापुर हा मिटणापुर शिवारातील बेबंळा धरणाचे कॅनाल कडे दुपारी ०३/०० वा दरम्यान म्हशी चारण्यास गेला असता सांयकाळी ५/०० वा तो कॅनाल जवळ जखमी अवस्थेत पडून असल्या बाबत माहिती मिळाल्याने त्यास प्रथम शासकीय रूग्णालय बाभुळगांव येथे उपचार करून रेफर केल्याने यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात आणले असता उपचारा दरम्यान रात्री १०/०० वा. तो मरण पावला यावरुन मृतकाचा भाऊ सैय्यद मनसब सैय्यद याचे तक्रारीनुसार सैयद नाजीम यांस कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी कोणत्यातरी हत्याराने छातीवर, बगलीखाली व डोक्यावर वार करून जिवानीशी ठार केले यावरुन पो.स्टे. बाभुळगांव येथे अप.क ०२४६/२५ कलम १०३ (१) भारतीय न्यासहीता प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद होता व तपास सुरु होता


सदर तपासात पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी गुन्हयातील आरोपीस निष्पन्न करून तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते यावरून गांवातील गोपनिय माहिती संकलीत करण्यात आली यामध्ये असे कळले की एक ते दिड वर्षापूर्वी मृतक यांचा त्याचे शेजारी जाबीर मुल्ला यांचे म्हशीला काठी मारण्यावरून वाद झाला होता. व मृतक यांने जाबीर मुल्ला यास थापड बुक्याने मारहान केली होती. तेव्हा पासुन त्याचे आपसात पटत नव्हते व बोलचाल बंद होती

या माहिती वरून यवतमाळ उपविभागीय पोलिस अधीकारी दिनेश बैसाने, पोलिस निरीक्षक सतीश चवरे स्थागुशा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात मृतकचे शेजारी जाबीर मुल्ला यांचा मुलगा युनूस मुल्ला यांस ताब्यात घेवून पो.स्टे. बाभूळगांव येथे आणून त्यास सखोल विचारपूस केली असता त्याने दिनांक १४/०४/२०२५ रोजी दुपारी ३/३० वा. मृतक सैयद नाजीम हा त्याचे म्हशी शेताचे जवळील कॅनालवर चारत असताना दिसला वरून व त्याचे सोबत पुर्वी झालेल्या वादावरून व मृतक यांने वडीलास केलेल्या मारहानीचा मणात राग ठेवून त्याचे जवळील धारदार लोखंडी विळयाने व काठीने मृतक चे छातीवर, बगलेखाली व डोक्यावर वार करून जिवानीशी ठारकेल्याची कबुली दिली. सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून अज्ञात आरोपी विरूध्द दाखल खुनाचा गुन्हा १२ तासाचे आत उघडकीस आणुन आरोपीस पुढील तपसा कामी पो.स्टे. बाभुळगांव यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधीकारी,यवतमाळ दिनेश बैसाने, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सतिश चवरे लहुजी तावरे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि गजानन राजमल्लू सफौसै. साजिद,बंडू डांगे, पोहवा रूपेश पाली,योगेश डगवार,पोशि आकाश सुर्यवंशी, देवेंद्र होले, चापोहवा योगेश टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


