पोलिस अधीक्षकांचे नशाखोरी विरोधातील प्रस्थान उपक्रमा अंतर्गत यवतमाळ पोलिसांच्या गांजाविरोधी दोन मोठ्या कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचे प्रस्थान उपक्रमानुसार,स्थानिक गुन्हे शाखेने बाभुळगाव हद्दीतुन अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणाऱ्या तिन आरोपींना वाहनासह ताब्यात घेवून २५,४८,०००/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत,त्याचप्रमाणे दराटी पोलिसांनी गांजाची लागवड करणारे दोन आरोपींना ताब्यात घेऊन १०,०००००/-रु चा मुद्देमाल केला जप्त….

यवतमाळ(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्हा येथे प्रस्थान उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे ज्यामधे यवतमाळ जिल्हा कसा आपल्याला नशा मुक्त करता येईल याकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालयांमध्ये सतत कार्यक्रम घेणे सुरू आहे, येणारी पिढी, दिशा भटकून गुन्हेगारीकडे न वळता कशी नशा मुक्त करता येईल याकडे वाटचाल सुरू केली आहे,त्यानुसार पोलिस अधीक्षक यांनी सर्व ठाणेदारांना सूचना दिलेल्या आहे की कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसायावर जलद गतीने कार्यवाही करण्यात यावी यावर पोलिस अधिक्षक स्वतः  जातीने लक्ष घालून व विशेष सूचना देऊन प्रत्येक बाबींवर त्यांची नजर आहे





त्यानुसारच दि(०२) रोजी पोलिस स्टेशन बाबुळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व पोलिस स्टेशन दराटी येथे एनडीपीएस च्या दोन यशस्वी कार्यवाही घडवून आणल्या, ज्यामध्ये 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करून सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास सुरू आहे



याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०१/१०/२०२४ रोजी रात्री ९.०० वा.चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलिस ठाणे बाभूळगांव हद्दीत अवैध धंदे विरुध्द कारवाई करण्या संबंधाने पेट्रोलीग करीत असतांना पथकास खात्रीशीर गोपनीय खबर प्राप्त झाली की, रात्रीतून कळंब बाभुळगांव मार्गाने एक ग्रे रंगाची हर्युदाई क्रेटा कार क्र. सी.जी. १२ ए.की. ०५१५ मधून काही इसम हे छत्तीसगढ़ वरुन कळंब त बाभुळगांव मार्गाने नेर येथे अवैधरित्या गांजा नावाचा अंमलो पदार्थ घेवून जाणार आहेत.



अशा माहिती वरुन पथकाने कारवाई करीता लागणारे कायदेशीर सोपस्कार पार पाडुन वरिष्ठांचे परवानगीने कारवाई करीता लागणारे साहित्य, शासकीय पंच व फोटोग्राफर, मोजमाप करणारे मापारी इत्यादीसह संशयीत वाहन जाणार असलेल्या संभाव्य मार्गावरील कळंब ते बाभुळगांव रोडवरील तहसिल कार्यालयासमोर असलेल्या सुयोग ऑनलॉईन सर्विसेस समोर रस्त्याचे दुतर्फा नाकाबंदी लावून थांवले असतांना रात्री अंदाजे ११.४० वाजताचे सुमारास प्राप्त माहिती प्रमाणे संशयीत वाहन येतांना दिसल्याने त्यास पो. स्टाफ चे मदतीने थांबवुन त्याची पाहनी केली असता वाहनात दोन इसम व एक महिला दिसून आल्याने त्यांना वाहनाचे खाली उतरवून नांव गांव विचारले असता ड्रायव्हर सिट वरील इसमाने त्याचे नांव १) सोहेल शहादत खान वय २० वर्ष, रा. लामीदरहा, बोईरदादर, जि. रायगड, छत्तीसगढ, व वाहनातील इसमाने त्यांचे नाव २) शहादत खान उस्मान खान वय ६० वर्ष, ३) महिला वय अं. ६० वर्षे दोन्ही रा. लामीदरहा, बोईरदादर, जि. रायगड, छत्तीसगढ़ असे सांगीतल्याने त्यांना पंचासमक्ष कारवाई संबधाने माहिती देवून त्यांचे वाहनाची झडती घेतली असता वाहनाचे डिक्की मध्ये दोन हिरव्या व एक पिवळया रंगाचे प्लास्टीक पोते आढळून आले, सदर पोत्यांची पाहाणी केली असता त्यामध्ये हिरवट काळपट ओलसर गांजा नावाचे अंमली पदार्थाच्या फुले, बिया, पाने एकुण वजन ६१.५०० किलोग्राम किमंत १२,३०,०००/- रुपयाचा आढळून आल्याने आरोपीचे ताब्यातून सदरचा गांजा व वाहन हयुंदाई क्रेटा कार क्र. सी.जी. १२ ए.व्ही. ०५१५ किमंत १३,००,०००/- रु. व ०३ मोबाईल फोन असा एकूण २५,४८,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नमुद आरोपींनी सदर गांजा कोठुन व कोणा करीता आणला याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गांजा हा ओडीसा येथुन ४) गोपाल रा. दयाडेरा यांचेकडुन खरेदी करुन आणल्याचे व नेर जिल्हा यवतमाळ येथील ५) सलीम रा. चमन नगर, नेर यास विक्री करीता नेत असल्याचे सांगीतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी व मुद्देमाल पो.स्टे. बाभुळगांव यांचे ताब्यात देण्यात आला असून सर्व आरोपीविरुध्द पोलीस ठाणे बाभुळगांव येथे NDPS Act. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे दिनांक ०१/१०/२०२४ रोजी दराटी पोलीसांची ग्राम शिरफुल्ली येथे गांजा लागवड करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई करत शिरफुल्ली शेतशिवारात धाड टाकुन  दोन सख्खे भाऊ १) रामेश्वर पुंजाजी पोटे वय ५५ वर्ष, रा. शिरफुल्ली शेतशिवार ता. महागांव जि.यवतमाळ २) परमेश्वर पुंजाजी पोटे वय अंदाजे ५० वर्ष, रा. शिरफुल्ली शेतशिवार ता. महागांव जि.यवतमाळ यांना ताब्यात घेऊन १० लाख रुपयांचा गांजा जप्त, ०२ आरोपींना अटक केली.

सदरची कारवाही ही पोलीस अधिक्षक कुमार चिता, अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, सपोनि सुगत पुंडगे, सपोनि अमोल मुडे व पोलीस अंमलदार बंडू डोंगे. योगेश गटलेवार, शेख साजीद, अजय डोळे, रुपेश पाली, रितुराज मेढवे, विनोद राठोड, आकाश सहारे, महिला अंमलदार ममता देवतळे चालक अंमलदार विवेक पेठे, योगेश टेकाम व फोटोग्राफर अंमलदार अमीत मेश्राम, सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ येथील पोलीस अंमलदार सचीन देवकर, प्रगती कांबळे, पुजा भारस्कर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

तसेच दराटी येथील कार्यवाही वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी, हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. योगेश बाघमारे, ठाणेदार पोस्टे दराटी, पो. हवा. संभाजी केंन्द्रे, पो.शि रवि जाधव, संदिप हनवते, रमेश पाटील,  गोविंद खाडे, इंदल राठोड, अनिल माने चासफौ भगवान शिरडे, नापोशि  किशोर भगत यांनी केली.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!