चिंतामणी मंदीरातील मुकुट चोरणारा चोरटा २४ तासात दारव्हा पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

दारव्हा(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की  दारव्हा शहर व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या यवतमाळ मार्गावरील चिंतामणी गणपती मंदीरातील मुर्तीचा चांदीचा मुकुट काल संध्याकाळी 06/15 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेला ही वार्ता शहर व परिसरात समजताच नागरींकामध्ये
एकच खळबळ उडाली होती. या संबंधाने पो.स्टे. दारव्हा येथे अपराध नंबर 946/2023 भा.द.वि.379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

याबाबत वरिष्ठांना माहीती मिळताच त्यांनी ही बाब जनतेच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्यामुळे तात्काळ चोरट्याचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.
घटना घडताच ठाणेदार पोलिस निरिक्षक विलास कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेत बारकाईने पाहणी केली सहकार्याच्या मदतीने रात्रीच शहरातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. पैकी एका सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटा दिसुन आला त्याची माहीती फोटोसह सोशल मिडीयावर देऊन नमुद आरोपीची माहीती देणेबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते.
आज दुपारी गुप्त बातमीदारांने सदर फोटोशी मिळता जुळता ईसम कारंजा रोडने दारव्हाकडे येत असल्याची माहीती ठाणेदार यांना दिली त्यानी क्षणाचाही विलंब न करता स्टॉफसह माऊली फाटयाजवळ सापळा रचला. वर्णनातील ईसम भरधाव वेगाने मोटार सायकलने जातांना दिसल्याने त्यावर झडप घालुन त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव





अमोल लक्ष्मण चव्हाणे वय 19 वर्ष रा. चिखली ता. दारव्हा



असे सांगीतले त्यास पो.स्टे. ला आणुन विचारपुस केली असता तो काहीही सांगण्यास तयार नव्हता. मात्र त्यास सीसीटीव्ही फुटेज दाखविताच त्याचे आवसान गळाले व त्याने गुन्हयाची कबुली दिली. चोरी केलेला गणपतीचा मुकुट भोपापुर फाट्याजवळ लपविला असल्याचे सांगीतल्याने पोलिसांनी पंचासमक्ष चोरीतील गणपतीचा मुकुट जप्त केला. व मंदीर चोरीसारखा संवेदनशिल विषयाला अवघ्या चौवीस तासात पुर्णविराम दिला.
सदरची कार्यवाही  डॉ. पवन बन्सोड पोलिस अधिक्षक, यवतमाळ,  पियुष जगताप अप्पर पोलिस अधिक्षक यवतमाळ, आदित्य मिरखेलकर सहा. पोलिस अधिक्षक दारव्हा यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस निरिक्षक विलास कुलकर्णी पो हवा  महेंद्र भुते,  रवि मोर्लेवार, नापोशि युवराज चव्हाण, ओंकार गायकवाड, पोशि निखील इंगोले यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!