
यवतमाळ LCB ने गावठी कट्ट्यासह एकास घेतले ताब्यात….
अवधुतवाडी परीसरातुन अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगुण असलेल्या एकास स्थानिक गुन्हे शाखेने अग्नीशस्त्रसह घेतले ताब्यात…
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी लोकसभा निवडणुक संबधाने पाहिजे व फरार असलेले आरोपी व वारंट मधील आरोपी शोध, अवैध धंदे विरुध्द कारवाई, अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार तसेच संशयीत व सक्रीय गुन्हेगारांची माहिती काढुण प्रलंबीत गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी आदेशीत केले होते


त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक प्रयत्नशील असतांना दिनांक ०९/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला गोपणीय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, इसम नामे गुलाब बापुराव इंगळे रा आठवडी बाजार तारपुरा यवतमाळ हा आपले कंबरेला गावठी बनावटीची पिस्टल (कट्टा) लावुन आठवडी बाजार परिसरात फिरत आहे. अशा विश्वसनीय माहिती वरुन पथकाने तात्काळ आठवडी बाजार परिसर यवतमाळ येथे पोहचुन प्राप्त माहितीची खातरजमा करणे करीता माहिती प्रमाणे इसमाचा शोध घेत असतांना गुलाब बापुराव इंगळे वय ५८ वर्षे, रा. आठवडी बाजार तारपुरा यवतमाळ हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन अंगझडती घेतली असता एक काळपट लाकडी व लोखंडी पिस्टल ग्रीप असलेला दोन ट्रिगर व सिंगल बॅरल असलेला देशी कट्टा किमंत १५,००० रु व ०२ नग जिवंत काडतुस असा एकुण १५,२००/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करुन आरोपी गुलाब बापुराव इंगळे वय ५८ वर्षे, रा.आठवडी बाजार तारपुरा यवतमाळ यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुश जगताप, आधारसिंग सोनोने पो. नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि विवेक देशमुख, पोलिस अंमलदार, बंडु डांगे, सै साजीद, अजय डोळे, रितुराज मेडवे, रुपेश पाली, निलेश राठोड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



