
बाभुळगाव शहरात देशीकट्टा घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या….
बाभुळगाव(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक स्थानिक गुन्हे शाखा, कार्यालय यवतमळ येथे हजर असतांना बातमीदारामार्फत गोपणीय माहिती मिळाली की, एक इसम ज्याचे नाव शेख राहील शेख युनुस वय २२ वर्षे, रा. धोंगडे बाबा लेआउट बाभुळगांव हा बाभुळगांव शहरात देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) घेवुन फिरत आहेत. या खबरचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ माहिती प्रमाणे बाभुळगांव येथे पोहचुन पुनश्च बातमीदाराकडुन माहीती घेतली असता राहील शेख हा गावात जाणाऱ्या रोडवर बागीलाल पार्क जवळ देशी कट्टयासह उभा असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ घटनास्थळावर पोहचुन माहिती प्रमाणे शोध घेत असतांना बागीलाल पार्क जवळ एक इसम संशयास्पद स्थितीत असतांना दिसुन आले वरुन त्यांना ताब्यात घेवून त्याचे नांव गांव
विचारले असता त्यांनी माहिती प्रमाणे त्याचे नांव
शेख राहील शेख युनुस वय २२ वर्षे, रा. धोंगडे बाबा लेआउट बाभुळगांव
असे सांगीतल्याने पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये त्याचे अंगावरील लोअर पॅन्टचे डाव्या खिशात एक
देशी बनावटीची पिस्टल (अग्नीशस्त्र ) किंमत अं. ५०,००० रुपये ची मिळुन आली तसेच पिस्टलचे मॅग्जीन मध्ये ०१ जिवंत काडतुस किमंत १०००/ रु चे मिळुन आल्याने पिस्टल व जिवंत काडतुस असा एकुण ५१,०००/- रु किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपी शेख राहील शेख युनुस याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ व कलम १३५ म.पो.का अन्वये पोलिस ठाणे बाभुळगांव येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी शेख राहील शेख युनुस हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द रेती चोरी व शरीराविरुध्दचे गुन्हे सुध्दा पो.स्टे. बाभुळगांव येथे नोंद आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात सहा पोनिरी संतोष मनवर, पोलिस अंमलदार विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, आकाश सहारे सर्व स्थागुशा यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.




