
जिल्हापरीषदेच्या गोडाऊन मधे चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
जिल्हापरिषद यवतमाळ चे गोडावुन फोडुन चोरी करणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखे कडुन अटक…..
यवतमाळ (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेल्या गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अभिलेखावरील गुन्हेगारांची गोपनिय माहीती काढुन गुन्हे उघडकीस आणने बाबत सुचना दिल्या होत्या. दिनांक १९/१२/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे आदेशानुसार स्थागुशा चे पथक पेट्रोलींग करीत असतांना सहा.फौ. बंडु डांगे स्थागुशा यवतमाळ यांना गोपनिय माहीती मिळाली की, अंबा नगर यवतमाळ येथील काही इसमांनी जिल्हा परिषदेचे मागील बाजुस असलेले गोडावुन फोडुन त्यातुन लोखंडी पाईप व इतर साहीत्य असा मुद्देमाल बरेच दिवसापासुन चोरी करुन विक्री करीत आहेत. अशा खात्रीशीर खबरेवरुन स्थागुशाचे पथकाने दिनांक १९/१२/२०२३ रोजी अंबानगर, यवतमाळ परिसरात सापळा रचुन पाच संशयीत इसम


१) ज्ञानेश्वर उर्फ नाना इंगोले वय ५४ वर्ष रा. अंबानगर यवतमाळ

२)योगेश उर्फ फाडया राजु तुपसुंदरे वय २२ वर्ष रा. तीन फोटो उमरसरा यवतमाळ

३)शंतनु सुरेश जुमडे वय २५ वर्ष रा. शिवाजी नगर लोहारा,
४) प्रदिप उर्फ अक्कु देवीदास अग्रवाल वय २८ वर्ष रा. अंबा नगर
५) अंकुश ज्ञानेश्वर इंगोले वय २७ वर्ष रा. अंबा नगर, यवतमाळ
यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता नमुद इसमांनी पाहीजे आरोपी
६) अंकुश ज्ञानेश्वर इंगोले वय २७ वर्ष रा. अंबा नगर यवतमाळ
७) विजय अजाबराव इंगळे वय २१ वर्ष रा. अंबानगर यवतमाळ
८) सुरज उर्फ लाल विशाल मेश्राम वय २५ वर्ष रा. अंबानगर यवतमाळ
अशा सर्वांनी मीळुन मागील दोन महीण्यापासुन जिल्हापरिषदचे गोडावुन मधुन थोडे – थोडे पाईप काढुन चोरी केली असुन चोरीचा संपुर्ण मुद्देमाल हा पांढरकवडा रोडवरील भंगार दुकानदार
जाकीर खान गफ्फारखान वय ३५ वर्ष रा यवतमाळ
यास विक्री केला अशी कबुली दिली नमुद भंगार दुकानदार ‘याचे’ ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेला
१) ३९३ नग जि.आय. पाईप अं. १० फुट लांबी असलेले कि. २,१८,११५/- रु
२) ५७८ नग कनेक्टींग रॉड अं. १० फुट लांबी असलेले कि.८३,८१०/- रु
३) गुन्हयातील मुद्देमाल विक्री करीता वाहुन नेण्याकरीता वापरलेले
दोन टाटा एस वाहन कि.अं. ८,००,०००/- रु चे असा एकुण ११,०१,९२५/- रु चा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद प्रकरणात पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथे अप.क्र. १४५१/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादवि नुसार गुन्हा नोंद असुन आरोपी व मुद्येमाल पुढील तपासकामी पोलिस स्टेशन अवधुतवाडी चे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा.आधारसिंग सोनोने, सपोनि विवेक देशमुख, पोलिस अंमलदार बंडु डांगे, साजीद सैयद, अजय डोळे, रुपेश पाली, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे सर्व स्थागुशा यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली


