
यवतमाळ येथील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या वेश्या व्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…
यवतमाळ(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०८/११/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने दैनंदिन कामाकरीता स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात हजर असतांना गोपनीय
बातमीदारा कडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, यवतमाळ शहरातील, सनराईज शाळे समोरील मैथीली नगर, परिसरात योगीता नामक महिला आपले राहते घरात स्वतःच्या फायद्याकरीता महीलांकडुन अवैद्य देह विक्रीचा व्यवसाय चालवुन छुप्या पध्दतीने
कुंटनखाना चालवित आहे. अशा माहिती वरुन सदर ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदया अंतर्गत कार्यवाही करणे आवश्यक असल्याने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी स्था.गु. शा. कडील अधिकारी अंमलदार यांचेसह छापा कारवाईची संपुर्ण तयारी करून माहिती प्रमाणे छापा कारवाई करण्याकरीता एक बनावट ग्राहक तयार करुन त्यास ठरावीक रक्कम देवुन सनराईज शाळे समोरील मैथीली नगर येथे कुंटनखाना चालविणा-या महिलेस वेश्यागमणा करीता महीलेची मागणी करणे बाबत कळवुन पाठविले व ठरल्या प्रमाणे बनावट ग्राहकाने इशारा केल्या नंतर सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता माहिती प्रमाणे असलेल्या दुमजली घराचे खालच्या मजल्यावरील एका बेडरुममध्ये बनावट ग्राहकासह एक महिला मिळुन आली तसेच घराचे वरचे मजल्यावर एका बेडरूम मध्ये
१) सचिन अशोकराव कावरे वय ३५ वर्षे धंदा चौकीदार रा.साईनगर पिंपळगांव रोडयवतमाळ,


२) योगीता साहेबराव बन्सोड वय ३९ वर्षे, धंदा वैश्याव्यवसाय, रा. मैथीली नगर, यवतमाळ

असे मिळुन आल्याने सदर महिला पुरुष तसेच बनावट ग्राहकासह मिळुन आलेल्या महिला यांची पंचासमक्ष रितसर झडती घेतली असता कुंटनखाना चालविणारी महिला १) योगीता साहेबराव बन्सोड हिचे अंगझडतीमध्ये बनावट ग्राहक याने दिलेल्या ५००/- रुपये दराच्या ०३ नोटा व इतर नगदी १२००/- रु असे
एकुण २७०० रु आणि ०१ मोबाईल तसेच एक निरोध पाकीट, २) सचिन अशोकराव कावरे याचे अंगझडतीमध्ये नगदी ७६०/- रु ०१ मोबाईल कि.अ. ५०००/- रु तसेच त्याची घटनास्थळावर मिळुन आलेली अॅक्टीवा मोपेड कि. ६०,०००/- रु, ३) बनावट
ग्राहकासह मिळुन आलेल्या महिलेचे अंगझडतीमधुन नगदी ५०० रुपये ०१ निरोध पाकीट व ०१ मोबाईल असा मुद्देमाल मिळुन आला. अशा प्रकारे सदरचे छापा कारवाईत १) नगदी ३९६० /- रु, २) ०२ नग मोबाईल फोन किमंत १०,०००/-रु, ३) अॅक्टीवा मोपेड
क्रमांक एम.एच.२९ बि.ए. ५४१५ किमंत ६०,०००/- रु, ४) दोन नग निरोध पाकीट कि. ५०/- रु असा एकुण ७४०१०/- रुपयाचा
मद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष पंचनाम्या प्रमाणे जप्त करुन कुंटनाखाना चालविणारी महिला १) योगीता साहेबराव बन्सोड वय
३९ वर्षे, धंदा वैश्याव्यवसाय, रा. मैथीली नगर, यवतमाळ हिने घटनास्थळी मिळुन आलेल्या पिडीत महिलेस वेश्याव्यवसाय
करण्याकरीता प्रवृत्त केले असल्याने व २) सचिन अशोकराव कावरे वय ३५ वर्षे धंदा चौकीदार रा. साईनगर पिंपळगांव रोड यवतमाळ, हा वेश्यागमणा करीता मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पो.स्टे. लोहारा येथे स्त्री व मुली अनैतिक व्यापा प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा आधारसिंग सोनोने, सपोनि विवेक देशमुख, पोउपनि धनराज हाके, पोलिस अंमलदार बंडु डांगे, सैयद साजीद, रुपेश पाली, राहुल गोरे, रितुराज मेडवे महिला अंमलदार अरुणा भोयर, ममता देवतळे, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



