
ड्राय डे च्या दिवशी अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्यास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
यवतमाळ – दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती निमीत्ताने सर्व प्रकारच्या दारु विक्री करणाऱ्या आस्थापणा बंद
टेवण्याचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश होते. त्यामुळे ड्राय डे चे निमीत्त साधुन अवैध दारु साठा बाळगुन असणाऱ्यांचा शोध
घेवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी अधिनस्त पथकांना गोपणीय माहिती काढुन प्रभावी छापा कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन दिनांक ०२/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलिस स्टेशन मुकुटबन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना
पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, घोन्सा येथे राहणारा फकरु संभाजी नागपुरे याने घोन्सा गावाजवळील रोडवर असलेल्या
के. जी. एन. चिकन सेंटर चे बाजुला असलेल्या पडक्या घरामध्ये अवैधरित्या देशी दारुचा साठा करून ठेवला आहे. अशा खात्रीशीर
माहितीवरुन पथकाने तात्काळ घोन्सा येथे जावुन छापा कारवाई केली असता फकरु संभाजी नागपुरे रा. घोन्सा ता. वणी जि.
यवतमाळ देशी दारु विक्री करीत असतांना मिळुन आला. त्याचे कब्जातुन १) देशी दारु रुपेश संत्रा ९० एमएल क्षमतेच्या ५६ नग
शिश्या खुल्या २) देशी दारु रुपेश संत्रा १८० एमएल क्षमतेच्या २८ नग शिश्या खुल्या ३) पाच खरडयाचे बॉक्स मध्ये एकुण २४०
नग १८० एम. एल क्षमतेच्या शिश्या देशी दारु रुपेश संत्रा नावाचे लेबल असलेल्या ४) पाच खरडयाचे बॉक्स मध्ये एकुण ५००
नग ९० एम. एल क्षमतेच्या शिश्या देशी दारु रुपेश संत्रा नावाचे लेबल असलेल्या असा एकुण किंमत ३८,२२० रु चा देशी दारुचा
माल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला
सदर प्रकरणात पोलिस स्टेशन मुकुटबण येथे आरोपी फकरु संभाजी नागपुरे रा. घोन्सा ता. वणी जि. यवतमाळ याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक . पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा, यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुधीर पांडे, निलेश निमकर, भोजराज करपते, रजनिकांत मडावी, नरेश राउत सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


