
यवतमाळ वडगाव पोलिस स्टेशन हद्दीत शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,२९ लक्ष रु सह १६ आरोपी अटकेत…
यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयाचे समुळ उच्चाटण व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी स्था.गु.शा. कडील पथकांना अवैध धंदयाची गोपणीय माहिती काढुन प्रभावी छापा कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक २२/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील पथकाला ग्राम कारेगांव शेत शिवारात सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळ सुरु असल्याची विश्वसनीय गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.
त्यावरुन सदर ठिकाणी प्रभावी छापा कारवाई करणे करीता पोलिस निरीक्षक स्थागुशा यांनी लागलीच पथकास रवाना केले होते. स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने अल्प कालावधीतच ग्राम कारेगांव शेत शिवारातील घटनास्थळावर पोहचुन गोपणीय माहिती प्रमाणे जुगार अड्डयावर छापा कारवाई केली असता त्याठिकाणी आरोपी


१) राजु दत्तुजी गिरी वय ४९ वर्षे, रा. दांडेकर ले आऊट यवतमाळ, २) अजय नारायण देशमुख वय ४९ वर्षे, रा. आठवडीबाजार यवतमाळ,

३) विलास बळवंत भगत वय ४०वर्षे, रा. अंबानगरी घाटंजी,

४) मेघराज भगवानप घागी वय २६ वर्षे, रा. वरुड ता. यवतमाळ,
५) प्रतिक दत्तात्रय गंधारे वय २५वर्षे, रा. वसंतनगर ता. घाटंजी,
६) रवि महादेव विसमोरे वय ४२ वर्षे रा.इस्तारी नगर घाटंजी,
७) अतुल विश्वास चव्हाण वय २४ वर्षे रा. घोटी ता. घाटंजी,
८) चंदन आत्माराम पवार वय ३२ वर्षे रा. पारवा ता. घाटंजी
९) शकिल शेख चाँद वय ३० वर्षे रा. पारवा ता. घाटंजी,
१०) सागर आनंदराव खाडे वय ३० रा. वरुड ता. यवतमाळ,
११) संतोष आनंदराव मेश्राम वय ३६वर्षे रा. सुकळी ता.यवतमाळ, १२) सिद्धार्थ चरणदास रामटेके वय ३५ रा. शिवाजी वार्ड घाटंजी, १३) तैयब शहा उस्माण शहा वय ४९ वर्षे रा. तारपुरा यवतमाळ,
१४) दिपक सुरेशलाल जयस्वाल वय ३८ वर्षे रा. वडगांव यवतमाळ १५) प्रमोद हुकुमचंद छाजेड वय ५० वर्षे रा. गिलाणी नगर यवतमाळ,
१६) मुसव्विरखान मनवर खान वय २८ वर्षे रा. बाभुळगांव यवतमाळ
हे हारजितचा जुगार खेळ खेळतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन ५२ पत्ते जुगाराचे डावातील रोख २,००,३६०/- रुपये तसेच अंगझडतीत रोख ३,०१,८२० /- रुपये, असे एकुण ५,०२,१८० रुपये तसेच गुन्हयात एकुण जप्त मोबाईल व वाहने किं.अ. २४,४४,००० रुपये असा एकुण २९,४६,१८०/- रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपीतांकडे अधिक चौकशी केली असता सदरचा जुगाराचा अड्डा हा राजु दत्तुजी गिरी वय ४९ वर्षे, रा. दांडेकर ले आऊट यवतमाळ हा चालवित असल्याचे सांगीतले आहे. वरील नमुद सर्व आरोपीतांविरुध्द पोलिस स्टेशन वडगांव जंगल येथे आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सहा पोलिस निरीक्षक संतोष मनवर, पोउपनि धनराज हाके, पोहवा
विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, सुभाष किणाके, पोशि आकाश सहारे सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


