सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड….
अट्टल मोटारसायकल चोरट्यास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…
यवतमाळ (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारवाईसाठी स्थागुशा पथक गस्तीस असताना पथकाला माहिती मिळाली, त्या मिळालेल्या माहितीवरून स्थागुशा यवतमाळ यांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास शिताफीने अटक करून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकली किं.१,७५,००० रु.किमतीच्या या हस्तगत केल्या आहेत.
या बाबत थोडक्यात माहिती अशी की, (दि.१६जानेवारी) रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक स्थानिक गुन्हे शाखा, कार्यालय यवतमाळ हद्दीत गस्त करीत असतांना गोपणीय बातमीदाराकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की, किरन पेट्रोल पंप पांढरकवडा रोड यवतमाळ परिसरात एक इसम हा त्याच्या जवळील होंडा कंपनीची ड्रिम युगा काळया रंगाची लाल पट्टा असलेली मोटर सायकल क्र.MH-32-AN-1371 ही विक्री करण्याच्या उद्देशाने संशयीतरित्या फिरत आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन पथकाने सदरची बाब वरिष्ठांना कळवून त्यांच्या मागदर्शना प्रमाणे बातमीची शहानिशा करण्याकरीता लागलीच गेले असता बातमी प्रमाणे एक इसम किरण पेट्रोल पंप पांढरकवडा रोड यवतमाळ परिसरातील रोड वर माहिती प्रमाणे संशयीत इसम वाहनासह आढळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचा नाव-पत्ता विचारला असता त्याने आपले नाव गणेश पांडुरंग कुडमेथे उर्फ (गणेश भाउराव घोडाम) (वय ३५ वर्षे), रा.इंदीरा आवास घाटी ता.घाटंजी, जि.यवतमाळ असे सांगितल्याने त्याच्या ताब्यात असलेल्या वाहनासंबंधाने त्यास विचारपूस केली असता त्याने मालकी हक्का बाबत कोणतेही कागदपत्रे सादर न करता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकास त्याचे ताब्यत असलेली मोटर सायकल हो चोरीची असल्याचा दाट संशय आल्यावरुन पथकाने सदरील मोटरसायकल संबंधाने अधिक तपास केला असता सदरची मोटरसायकल ही पो.स्टे. मारेगांव, जि.यवतमाळ हद्दीतुन चोरी गेली असल्याचे व या प्रकरणी अपराध क्रमांक ०८/२०२४ कलम ३७९ भा.द. वि प्रमाणे गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळून आली. या नमुद संशयीत इसमास ताब्यात घेवून अधिक विचारपुस केली असता त्याने नमुद वाहना व्यतिरिक्त इतर मोटर सायकल वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरी केल्याची कबुली दिल्याने गणेश पांडुरंग कुडमेथे उर्फ (गणेश भाउराव घोडाम) याचेकडून भालर परिसर वणी येथुन चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्ह्यातील आरोपी गणेश पांडुरंग कुडमेथे उर्फ (गणेश भाउराव घोडाम) (वय ३५ वर्षे), रा. इंदौरा आवास घाटी ता.घाटंजी, जि. यवतमाळ यास पो.स्टे. मारेगांव अप.क्र. ०८/२०२४ कलम ३७९ गुन्हयात पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. मारेगांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, आधासिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलिस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतिश फुके सर्व स्वागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.