वयोव्रुध्द ईसमास लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वृध्द इसमांस लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक..

यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २३/१२/२०२३ रोजी  अरविंद शांतराम येन्नावार वय ६६ वर्ष रा. बांगर नगर, यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे तक्रार दिली की, ते त्यांच्या पत्नीचे उपचाराचे कागदपत्र घेवुन स्टेट बँक चौकातुन मोपेडने घराकडे जात असतांना त्यांचा तोल गेल्याने दोन अनोळखी इसमांनी काका पडत आहेत असे म्हणुन गाडी पकडली व  त्यांना काका आम्ही तुम्हाला घरी सोडुन देतो असे सांगीतल्याने अरविंद येन्नावार यांनी  ही अनोळखी मुले ओळखीची असतील म्हणुन त्यांना घरी सोडुन देण्याकरीता सांगीतले असता दोन्ही अनोळखी इसमांनी अरविंद येन्नावार यांना त्यांचेच मोपेडवर मधात बसवुन ट्रिपल सिट घेवुन रस्त्याने अंधार व निर्मणुष्य
असलेल्या ठिकाणी मोपेड थांबवुन अचानक फिर्यादीस लोटलाट करुन त्यांचे गळयातील सोन्याची साखळी व एक मोबाईल फोन जबरदस्तीने  हिसकावुन पळुन गेले अशा अरविंद येन्नावार यांचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे अपराध क्रमांक १२८१/२०२३ कलम ३९२, ३४ भादवि चा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने ,स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व त्यांचे अधीनस्त पथकांना आदेश दिले होते.त्या अनुषंगाने यवतमाळ उपविभागातील पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करित असतांना मिळालेल्या  गोपनिय व तांत्रीक माहितीच्या आधारे सदर गुन्हयात दोन आरोपी





१) कार्तीक संतोष भारती वय २० वर्षे रा. हनुमान नगर अकोट, जि. अकोला ह.मु. यवतमाळ



२) नवीनत सुधीर तिवाने वय २० वर्षे रा. रामपूर ता. अकोट जि. अकोला



यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरी केलेला मुद्येमाल १) १९.५३० ग्रॅम वजनाचा सोन्याची सोनसाखळी  गोफ (चेन) कि. १,२०,०००/- रु चा ( बाजार भावाने किंमत ) २) गुन्हयात चोरीस गेलेला एक ओपो कंपनीचा मोबाईल फोन कि.अं. १०,०००/- रु चा असा एकुन १,३०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीना पुढील तपासकामी पोलिस स्टेशन यवतमाळ शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही  पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा  आधारसिंग सोनोने, सपोनि विवेक देशमुख, पोलिस अंमलदार बंडु डांगे, साजीद सैयद, अजय डोळे, रुपेश पाली, बबलु चव्हाण, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे,
चालक अमीत सर्व स्थागुशा यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!