यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था खराब करणाऱ्या ५ सराईत गुन्हेगारांना १ वर्षातरीता केले हद्दपार…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

यवतमाळ शहरातील दोन धोकादायक व्यक्ती व पो.स्टे आर्णी हद्दीतील एक धोकादायक व्यक्ती व दोन शिक्षा प्राप्त आरोपी अश्या पाच सराईत गुन्हेगारांना  एका वर्षाकरीता यवतमाळ पोलिसांनी केले हद्यपार…

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे यवतमाळ शहर हद्दीतील ईसम  शाहरुख अली किस्मत अलि उर्फ सोनु कबुतर वय २५ वर्षे रा. कुरेशीपुरा कळंब चौक ता. जि. यवतमाळ याचा गुन्हेगारी अभिलेख असल्याने व तो अवैद्य शस्त्र बाळगणे, दुखापत करणे, चोरी करणे च्या सवईचा असल्याने व पो.ठाणे अवधुवाडी हद्दीतील ईसम चेतन भोजराज येरकंडवार
वय २५ वर्षे रा.आमराईपुरा ता. जि. यवतमाळ याचा गुन्हेगारी अभिलेख असल्याने व तो जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, जबरी
चोरी करतांना दुखापत करणे, व अवैद्य दारु गाळण्याचे सवईचा असल्याने तसेच पो.स्टे आणि येथील ईसम शेख सलीम शेख गफुर रा. शास्त्रीनगर ता. आणि जि. यवतमाळ त्याचे विरुध्द अवैद्य गुटखा विक्री, खुनाचा प्रयत्न, अश्लिल शिवीगाळ, अवैद्य शस्त्र बाळगणे बाबतचे गुन्हे आणि ईसम  वासुदवे मारोती पारधी वय ३५ वर्षे रा. देऊरवाडी पुनर्वसन ता.आर्णी जि. यवतमाळ व ईसम. आत्ताउल्ला खान शेख खैरुल्ला वय ४० वर्षे रा. मोमीनपुरा ता.आर्णी या दोघा विरुध्द अवैद्य जुगार सबंधाने गुन्हे नोंद असुन त्या दोघांनाही मा.न्यायालयाने शिक्षा सुनावली असतांना सुध्दा त्याचे वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याचे व त्याचे अवैद्य जुगार खेळविण्याचे कृत्य सुरुच होते.





त्या पाचही सराईत गुन्हेगारांचे सबंधीत ठाणेदारांनी हद्यपारीचे प्रस्ताव तयार करुन पोलिस अधिक्षक, यवतमाळ यांचे मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी, यवतमाळ यांचे कडे सादर केले होते. सदर पाचही प्रस्तावास मा. उपविभागीय दंडाधिकारी, यवतमाळ यांनी मंजुरी देवुन त्या सर्व पाचही सराईत गुन्हेगारांना यवतमाळ जिल्हयातुन ०१ वर्षे कालावधी करीता हद्यपार करण्या बाबतचे आदेश दिनांक १९/०४/२०२४ रोजी पारीत केले आहेत.जिल्हयात गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होणार नाही व गुन्हेगारांना वेळीच प्रतिबंध होवुन त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याने अशा प्रकारे शरीराविरुध्द व संपत्ती विषयक गुन्हे करणारे, अवैध रेती तस्करी, गावटी दारु तसेच टोळीने दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांवर आगामी काळात MCOCA तसेच MPDA, व महाराष्ट्र पोलीस कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असुन अशा गुन्हेगाराची गय केली जाणार नाही.



सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक यवतमाळ,. पियुष जगताप, सहा. पोलिस अधिक्षक तथा उप विभागिय पोलिस अधिकारी,दारव्हा, उपविभागिय पोलिस अधिकारी, यवतमाळ बैसाने यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्था. गु.शा.  आधारसिंग सोनोने,पो.नि. यवतमाळ  सतिश चौरे. तत्कालीन पो. नि. अवधुतवाडी ज्ञानेश्वर देवकत्ते, सपोनि  भोस, पो.नि. आणि  ठाकरे उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय यवतमाळ येथील अंमलदार आडे,उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय, दारव्हा येथील अंमलदार चव्हाण स्थागुशा येथील पोउपनि धनराज हाके, अंमलदार स.फौ. बालाजी ठाकरे, पोहवा राहुल गोरे, नापोशि.राम पोपळघट यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!