दरोडा टाकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुसद शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव पुसद शहर पोलिसांनी लावला उधळून आरोपींकडून चोरीचे १५ मोबाईल, चोरीची मोटारसायकल व  गुन्हयासाठी वापरण्यात आलेले घातक हत्यारे जप्त,पुसद शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची  कामगिरी…..

पुसद(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २७/१२/२०२३ रोजी पुसद शहर पोलिस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे आपले पथकासह सरकारी वाहनाने रात्रगस्त करीत असतांना रात्री १२.३० वा.चे दरम्यान
लक्ष्मीनगर बोरगडी रोडवर वानरे फर्नीचरचे समोरील बाजूस झाडाचे आडोशाला अनोळखी पाच ईसम संशयितरित्या हालचाल करतांना दिसले जवळ जाताच ते दरोडा घालण्याचे तयारीने दबा धरून बसल्याचे दिसल्याने त्यांना सापळा रचून अतिशय
कौशल्यपुर्ण रितीने पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोन इसम बाजूस उभ्या असलेल्या त्यांचे मोटारसायकल  वरून पळून गेले. पकडलेले ०३ ईसम त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे





१) अनिल नागोराव ढगे वय.३५ वर्ष, रा. शिवाजीनगर आंबेडकरवार्ड
ता.जि.नांदेड,



२) मोहम्मद शखील मोहम्मद इब्राहीम वय.४५ वर्ष, रा. खडकपुरा ता.जि.नांदेड,



३) शेख मोशीन शेख अहमद वय.३२ वर्ष, रा. जनता न्यु आबदी शिवाजीनगर ता.जि.नांदेड

त्यांची झडती घेवून त्यांचेजवळ असलेल्या बॅगची पाहणी करता त्यांचेकडे वेगवेगळया कंपनीचे एकूण १४ चोरीचे मोबाईल, ०१
चोरीची मोटार सायकल, दोन चाकू, एक लोखंडी कोयता, एक आरा पत्ता, एक लोखंडी रॉड, मिरची पावडर, लोखंडी पकड, एक २२ फूट लांब रस्सी, रोख २०००/- रू. असा एकूण १,४१,६५०/- रू.चा
मुद्देमाल मिळून आल्याने पो हवा  प्रफूल इंगोले पोलिस स्टेशन पुसद शहर यांनी दिले फिर्यादीवरून पुसद शहर पोलिस स्टेशन अप.क्र. ८४०/२०२३ कलम ३९९, ४०२ भा.द.वी.प्रमाणे एकूण ०५ आरोपींचे विरूध्द
सदरचा गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक  उमेश बेसरकर यांनी सदर बाबत सहायक पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी पुसद पंकज
अतुलकर  यांना माहीती देवून त्यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमूख पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे
व पथक यांनी सदर आरोपीकडे सखोल तपास करता आरोपींनी सदरचे मोबाईल हे माहूर, पुसद, दिग्रस या परिसरातून चोरी गेल्याचे कबूल केले असुन यातील आरोपी . १) अनिल नागोराव ढगे हासराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी नांदेड जिल्हयात चोरीचे एकूण ०३ गुन्हे, हिंगोली जिल्हयात चोरीचे एकूण ०२ गुन्हे तसेच नांदेड जिल्हयात दरोडा टाकण्याची पूर्वतयारीचा ०१ गुन्हा असे एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक  पियुष जगताप, सहायक पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी पुसद पंकज अतुलकर  यांचे
मार्गदर्शनाखाली व पुसद शहर पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे सुचना प्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलिस
उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो.हवा. प्रफूल इंगोले,  अतुल दातीर, नापोशि दिनेश सोळंके, मनोज कदम, पोशि आकाश बाभूळकर, शुध्दोधन भगत, वैजनाथ पवार, चा.पो.ना.सुनिल ठोंबरे तसेच
वसंतनगर पोलिस स्टेशन कडील पो.हवा.मुन्ना आडे, नापोशि संजय पवार यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!