
पुसद येथील नदीपात्रात मिळालेल्या अनोळखी प्रेताची ओळख पटवून मारेकर्यास ४ तासात केली अटक…
पुसद(यवतमाळ)- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १४/१०/२३ रोजी पुसद शहर पोलिस स्टेशन येथे संध्याकाळी ५.०० वाजता शेख सलीम शेख युनुस वय ३६ वर्षे रा मच्छिमार्केट आंबेडकर वार्ड पुसद यांनी येऊन तक्रार दिली की त्याचा लहान भाऊ शेख अज़ीम उर्फ बाबु हा कुनालाही न सांगता घरातून निघुन गेलाय व अजुनपावेतो घरी परत न आल्याने दिनांक १५/१०/२३ रोजी मिसींग तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु दिनांक २३/१०/२३ रोजी शहरातील तवक्कलशहा दर्ग्याजवळ पुस नदिचे पात्राजवळ पोलिस व लोक जमलेली दिसली त्या ठिकाणी जाऊन पाहीले असता तेथे सडलेल्या व दोन्ही हातपाय बांधलेल्या व कपड्याने गळा आवळल्या स्थितीत मिळुन आलेला म्रुतक हा माझा भाऊ शेख आजीम उर्फ बाबु शेख युनुस वय २३ वर्ष असल्याचे सांगितले व माझ्या भावास कोणीतरी गळा आवळुन जिवे मारले व त्याची लाश ही नदी पात्रात फेकुन दिली व पुरावा मिळु नये म्हनुन नजीकच्या गवतात फेकुन दिले अशा . तक्रारीवरुन पुसद शहर पोलिस स्टेशन अप.क. ७५० २०२३ कलम ३०२, २०१ भा.द.वी. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला व तपास सुरु होता
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी सदर बाबत पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड , अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप ,सहायक पोलिस अधीक्षक तथा उप-विभागीय पोलिस अधिकारी पुसद पकंज अतुलकर यांना माहीती देवून त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे. डी.बी. प्रमूख पोलिसउपनिरीक्षक शरद लोहकरे व डि.बी.स्टाफ यांनी तात्काळ घटनास्थळी जावून गोपनीय रित्या तसेच तांत्रिक दृष्ट्या सदर अज्ञात आरोपींचा शोध घेतला असता सदर मयत याचे सोबत घटनेच्या रात्री असलेल्या काही मुलाबाबत डि.बी. पथक यांना गोपनीय माहीती प्राप्त झाल्याने त्याप्रमाणे पोलिसांनी सदर संशयित सर्व इसमाकडे सखोलरित्या पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस करता यातील आरोपी
१)अनिकेत रवि म्हस्के वय १८ वर्ष, रा. मुखरे चौक पुसद ता. पुसद जि. यवतमाळ,


२) अजय पंडीत जोगदंडे वय २१ वर्ष, रा. आंबेडकरवाई पुसद ता पुसद जि. यवतमाळ,

३) तुषार प्रदीप लोखंडे रा. आंबेडकरवाई पुसद एसद जि. यवतमाळ यांनी पूर्व वैमनस्यातून सदर गुन्हा केल्याचे कबूल केल्याने यातील आरोपी अ.क्र.१ व २ यांना अटक करण्यात आली असून, यातील आरोपी अ. क. ३ हा अल्पवयीन असल्याने त्याला बालन्यालयात हजर करण्यात येईल.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड साहेब, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप , सहायक पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शनाखाली व पुसद शहर पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर,
सहा पोलिस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांचे सुचना प्रमाणे डी. बी. प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे, अनिल सावळे, पो.हवा. प्रफूल इंगोले, सुनिल पवार, पो.ना.दिनेश सोळंके, मनोज कदम, ज्ञानेश्वर कराळे, पो. कॉ. आकाश बाभूळकर, शुध्दोधन भगत, वैजनाथ पवार, चा.पो.ना.सुनिल ठोंबरे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक गणेश इंगोले हे करीत आहेत.



