
मोटारसायकल चोरट्यास राळेगाव पोलिसांनी केली अटक,४ गुन्हे केले उघड…
राळेगाव(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी नामे संतोष नामदेव वाघमारे वय 45 वर्ष रा. झाकीर हुसैन कॉलोनी वर्धा ता.जि. वर्धा यांनी दि. 02/11/2023 रोजी पोस्टे राळेगाव येथे तोंडी तक्रार दिली की, दि. 31/10/2023 च रात्री 2.00 वा. दरम्याण फिर्यादी यांनी त्याची मोटर सायकल Splender Plus क्र. एम. एच. 32 ए.यु. 6503 विश्रामगृह राळेगाव समोर पार्कींग करून ठेवली व वाहन परत घेणे करीता 04/00 वा. दरम्याण परत आले असता
त्यांची मोटर सायकल मिळुन आली नाही ती अज्ञात चोराने चोरून नेली अशा जबानी रिपोर्ट वरून पोस्टे राळेगाव अप क्र. 0578/2023 कलम 379 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरु असतांना सदर गुन्ह्याचे तपासामधे चोरीस गेलेली मोटर सायकल Splender Plus क्र. एम. एच. 32 ए.यु. 6503 चा व आरोपीचा शोध सुरु असतांना गोपनिय माहीतीगाराकडुन माहीती मिळाली की, एक ईसम ग्राम लोहार परीसरामधे चोरीस गेलेल्या वर्णनाप्रमाणे मोटर सायकल घेवुन संशईतरित्या फिरत आहे. अशा
माहीती मिळाली वरून पोनि जाधव यांनी पोहेकॉ वास्टर, पोना सुरज, विशाल,सुरज गावंडे यांना खाजगी वाहनाने रवाना केले असता ग्राम लोहारा जंगल परीसरामधे चोरीस गेलेली मोटर सायकल Splender Plus क्र. एम. एच. 32 ए.यु. 6503 घेवुन एक ईसम संशईतरित्या फिरतांना दिसला असता त्यास पोस्टे स्टाफने पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव
सुमीत निरंजन भगत वय 30 वर्ष रा. नांझा ता. कळंब जि. यवतमाळ ह.मु. पिवळी नदी जवळ नागपुर


असे सांगीतले. आरोपी कडुन मोटर सायकल Splender Plus क्र. एम. एच. 32 ए.यु. 6503 कि. 1,00,000/- रूपये जप्त करण्यात आली. आरोपीस अटक करून सविस्त विचारपुस केली असता आरोपी यांनी पोस्टे राळेगाव व ईतर यवतमाळ जिल्हा पोस्टे परीसरामधुन चोरी केलेल्या 4 मोटर सायकली चोरी केल्याची दिली व ग्राम लोहारा परीसरातील घनदाट जंगल परीसरामधुन एक खड्यामधे लपवुन ठेवलेल्या खालील मोटर सायकल जप्त करून ताब्यात घेतल्या.
1) हिरो होन्डा पॅशन प्रो एम. एच 29 क्यु 2459 कि. अंदाजे 50,000/- रूपये,

2) बजाज प्लटीना क्र.एम. एच 32 एम 3598 कि. अं. 50,000/- रूपये

3) हिरो प्लेझर मोपेड मो.सा. कि. 50,000/- रूपये
3 ) बजाज बॉक्सर बनावटी पिवळ्या रंगाची कि.अ. 40,000/- रूपये क्र.
4) Splender Plus क्र. एम. एच. 32 ए.यु. 6503 कि. 1,00,000/- रूपये
असा एकुण 2,90,000/- रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक पवन बन्सोड ,अप्पर पोलिस अधीक्षक पियुश जगताप साहेब, उपविभागीय पोलिस अधीकारी पांढरकवडा . रामेश्वर वेंजने यांचे मार्गदर्शाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव ठाणेदार राळेगाव, पोलिस अंमलदार गोपाल
वास्टर, सुरज चिव्हाणे, सुरज गावंडे, विशाल कोवे यांनी केली.


