
गावठी पिस्टलमधुन हवेत फायर करून वाढदिवस साजरा करणा-या सराईत गुन्हेगाराच्या वणी पोलीसांनी आवळल्या मुसक्या…
वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २७/११/२०२३ रोजी गणेश किंद्रे उप विभागीय पोलिस अधिकारी,वणी यांनागोपनीय माहीती मिळाली की, राजुर ते भांदेवाडा रोड लगत असलेल्या कश्यप यांचे शेतात उमेश राय याचे वाढदिवसानिमीत्ताने पार्टी आयोजीत केली आहे. अश्या खबरे वरून उप विभागीय पोलिस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अजित जाधव पोलिस स्टेशन वणी यांनी नमुद ठिकाणी दिनांक २८/११/२०२३ चे ०२/०० वा पोलीस पथकासह नमुद ठिकाणी गेले असता तेथे थांबुन असलेले काही ईसमांची पळा -पळ सुरू झाली. त्यातच उमेश किशोरचंद राय हा पळुन जाऊ लागला त्याचा पोलिस पथकाचे मदतीने पाठलाग करून पकडले असता त्याचे जवळ एक स्टिलची जिचे मुठीवर लाकडी पटट्टी असलेली मॅग्झीनची पिस्टल(अग्नीशस्त्र) मिळुन आली. त्यास पिस्टल बाबत विचारपुस केली असता वाढदिवस निमीत्ताने घेवून आलो व वाढदिवसाचा केक कापतांना दोन रांउड हवेत फायर केले असल्याचे सांगीतले व तेथील ठिकाणी पाहणी केली असता दोन फायर केलेले खाली केस मिळुन आले. पिस्टल व दोन खाली केस जप्त करण्यात आले. वरून पोलिस स्टेशन वणी येथे अप.क. १३५४/२३ कलम ३,७,२५,२७ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी उमेश राय यास अटक करण्यात आली.
उमेश किशोरचंद राय रा.प्रगतीनगर कोलार पिपरी.वणी हा रेकार्ड वरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर पोलिस स्टेशन वणी येथे खुन, अपहरण सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन नमुद आरोपी हा मागील १ वर्षापुर्वी खुनाचे गुन्हयातुन कारागृहातुन सुटला होता व तो आपले सोबत अग्निशस्त्र बाळगुन फिरत असल्या बाबत खात्रीशिर माहीती होती. परंतु पोलिस त्याचे मागावर असतांना तो पोलिसांचे हाती येत नव्हता गुगांरा देत होता
सदरची कार्यवाही डॉ.पवन बंन्सोड पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलिस अधीक्षक यवतमाळ, रामेश्वर वैजने उपविभागिय पोलिस अधिकारी,वणी, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक अजित जाधव ठाणेदार वणी, जनार्धन खंडेराव सपोनि मारेगांव, दत्ता पेंडकर, सफौ सुदर्शन वानोळे, पोना पंकज उंबरकर, संतोष आढाव, अमोल अन्नेलवार, अविनाश बनकर, पोशि विशाल गेडाम, श्याम राठोड, मो. वसीम, पुरूषोत्तम डडमल, गजानन कुडमेथे निरंजन खिरडकर यांनी केली.




