विनापरवाना अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे दोन हायवा ट्रक वणी पोलिसांनी केले जप्त….
वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस निरीक्षक अजित जाधव ठाणेदार पोलिस स्टेशन वणी हे दिनांक १४/११/२०२३ रोजी पोलिस अंमलदार सुहास मंदावार यांचे सह शासकीय वाहनाने जिल्हा गस्त करीत असतांना तसेच पो. हे. कॉ विकास धडसे व पोलिस अंमलदार सागर सिडाम हे रात्रगस्त कर्तव्य अधिकारी म्हणुन पेट्रोलींग करीत असतांना पोलिस निरीक्षक अजित जाधव यांना गोपनीय बातमीदार यांचे कडुन खात्रीलायक खबर प्राप्त झाली की, चंद्रपुर जिल्ह्यामधुन ०२ हायवा ट्रकमध्ये अवैधरीत्या विनापरवाना वाळु भरून कोणतेही कागदपत्र व परवाण्या शिवाय वाहतुक करून शिरपुर मार्गे वणी कडे घेवून येत असुन नमुद दोन्ही ट्रकचे समोर पांढरे रंगाची बोलेरो चारचाकी वाहन पेट्रोलींग करून नमुद दोन्ही वाहनास दिशानिर्देश देत आहेत अशा माहीती वरून नमुद वाहनांना नाकाबंदी करून कायदेशीर कार्यवाही करणे करीता लालगुडा चौपाटी येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असतांना रात्री ०१/३० वा.चे सुमारास शिरपुर कडुन एक चारचाकी वाहन व त्यामागे दोन हायवा ट्रक येतांना दिसले त्यांना पंचासमक्ष थांबवुन नमुद वाहनांची पाहणी केली असता दोन्ही ट्रकमध्ये वाळु भरून असल्याचे दिसुन आले वरून वाहन चालकांना सदरच्या. वाळुबाबत वैद्य परवाना, रॉयल्टी अथवा बिल्टी तसेच वाहतुक पास आहे किंवा कसे? तसेच सदरची वाळु कोणाचे मालकीची आहे? कोठुन आणली व कोठे घेवुन जात आहे? याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांचेकडे कोणताही वैद्य परवाना, रॉयल्टी अथवा बिल्टी तसेच वाहतुक पास नसल्याचे तसेच सदरची रेती त्यांचे सोबत असलेले बोलेरो वाहनाचे व ट्रकचे मालक यांचे सांगणे वरून विरूर जि.चंद्रपुर येथुन भरणा करून शिरपुर मार्गे वणी येथे घेवुन येत असल्याचे सांगीतले करीता नमुद ट्रकमध्ये असलेली वाळु ही अवैधरीत्या विनापरवाना असल्याचे निष्पन्न झाले असल्याने
खालील प्रमाणे आरोपी इसम व मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
१) टाटा कंपणीचा १६ चाकी हायवा ट्रक क. MH 34BZ1514 मध्ये अंदाजे ०८ बास रेती किंमत ५०००/रु ब्रास प्रमाणे ४०,००० / रु तसेच वाहन ४०,००,०००/रु
२) टाटा कंपणीचा १६ चाकी हायवा ट्रक क. MH 34BZ1517 मध्ये अंदाजे ०८ ब्रास रेती किंमत ५०००/रु ब्रास प्रमाणे ४०,००० / रु तसेच वाहन ४०,००,०००/रु
३) महीन्द्रा कपणीची बोलेरो क. MH 34 CD 2635 किं. १०,००,०००/रु असा एकुण ९०,८०,००० / रु चा
मुद्येमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आला. तसेच ट्रक क. MH 34 BZ 1514 चे वाहन चालक
स्वप्नील बिजाकर वेलादे वय २७ वर्षे रा. ग्राम बेर्डी ता. राजुरा जि. चंद्रपुर
तसेच ट्रक क MH 34 BZ 1514 चे वाहन चालक
अक्षय परशुराम पेंदोर वय २७ वर्षे रा.ग्राम बेर्डी ता. राजुरा जि.चंद्रपुर
यांनी
महीन्द्रा बोलेरो क. MH 34 CD 2635 चे मालक तसेच ट्रकचे मालक नामे
रामप्रसाद भिकाराम चौधरी वय ४५ वर्ष रा. ग्राम वरूर ता. राजुरा ता. राजुरा जि.चंद्रपुर
याचे सांगणे वरून ट्रक चालकांनी त्यांचे ट्रक मध्ये प्रत्येकी ०८ ब्रास अशी १६ ब्रास वाळु कोणताही वैद्य परवाना, रॉयल्टी अथवा बिल्टी तसेच वाहतुक पास शिवाय वाहतुक करून तसेच शासनाचा महसुल बुडवुन स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता विक्रीसाठी अवैधरीत्या घेवून जात असताना मिळुन आले असल्याचे त्यांचे विरूद्ध कलम ३७९, ३४ भारतीय दंड विधाण सहकलम ४८ जमीन महसुल कायदा अन्वये नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही .डॉ पवन बनसोड पोलिस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलिस अधिक्षक यवतमाळ, गणेश किन्द्रे उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस निरीक्षक अजित जाधव तसेच पोलिस अंमलदार सुहास मंदावार, विकास धडसे, सागर सिडाम यांनी केली असुन सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार यांचे आदेशावरून पो.हे कॉ विकास धडसे हे करीत आहेत.