पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी केले हॅाटेल/धाबा चालकांना केले मार्गदर्शन…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, आज दि. २७/१२/२०२३ रोजी पोलिस अधिक्षक यवतमाळ यांनी पोलिस मुख्यालय,यवतमाळ येथे हॉटेल / धाबे यांच्या अडचणी जाणुन घेणे करीता तसेच दारु पिऊन वाहन चालविल्याने रस्त्यावर होणारे अपघात कसे कमी करता येतील याबाबत चर्चात्मक बैठक आयोजीत केली. सदर बैठकीला २०० हॉटेल/धाबे मालक हजर होते. सर्व हॉटेल/धाबे मालक यांनी त्यांचे हॉटेल व धाब्यावर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्याकरीता सहमती दर्शविली. तसेच सदर बैठकीमध्ये हॉटेल/धाबे यांचे मालक यांनी सुचविले की, त्यांचे हॉटेल कींवा धाब्याच्या समोर अथवा आजुबाजुला कुठलाही अपघात झाल्यास अथवा अपघाताची माहिती मिळाल्यास जखमींना
लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील याबाबद मदत करु. ब-याच ठिकाणी वाहण चालक विरुध्द दिशेने प्रवास करतात त्यामुळे अपघात होतात अशा पध्दतीने होणारे अपघात टाळण्यासाठी सुचनाफलक लावणे याबद्दल चर्चा केली. भांडणतंटे व अपघात होऊ नये याकरीता ३१ डीसेंबर रोजी तसेच ईतर दिवशी सुध्दा हॉटेल व धाब्यांवर दारु पिऊ देणार नाहित तसेच हॉटेल / धाबे नियमीत वेळेत बंद करतील याबाबत सुध्दा सर्वांनी सहमती
दर्शविली. हॉटेल/धाबे वर येणारे वाहन चालक यांनी हॉटेल/ धाबे समोर रस्त्यावर वाहने उभी केल्याने बरेचदा अपघात होतात असे अपघात टाळण्यासाठी सर्व वाहनांची पार्कींग करीता व्यवस्था करण्या करीता सुचीत करण्यात आले. यावर्शी एकुण ७९७ अपघाताची नोंद झालेली असुन यामध्ये एकुण ३७७ लोकांचा मृत्यु झालेला आहे.

अपघातातील जख्मींना तात्काळ मदत मिळावी याकरीता धाबे हॉटेलच्या समोर दर्शनीय भागावर अॅम्ब्युलन्स चा नंबर डायल ११२ असे अडचणीच्या वेळी तात्काळ मदत करण्यात येणारे क्रमांकाचे बोर्ड/ बॅनर लावावे तसेच अपघात प्रवण स्थळी रेडीयम लावलेले कोण ठिकठिकाणी ठेवण्याबाबत सुचीत केले व यानंतर दर
तीन महिन्यानी हॉटेल/ धावे मालक यांची नियमीत बैठक घेण्यात येईल व सर्व हॉटेल / धाबे मालक नेहमी संपर्कात राहण्याकरीता व्हाटसअॅप ग्रुप तयार करण्यात आला. ३१ डीसेंबर रोजी होणारे अनुचीत प्रकार तसेच अपघात टाळणेकरीता ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच विशेष मोहिम राबवुन दारु पीउन वाहन चालविणा-यावर कडक कार्यवाहि करण्यात येईल करीता नागरीकांनी दारु पिऊन वाहन चालवु नये.अपघात ग्रस्तानां नेहमी मदत करणारे श्री. दिलीप डबरे बासुरीवाले बाबा धाबा कंळब व श्री. भुपेंद्र भदोरीया अन्नपूर्णा धाबा कायर वणी यांचा सदर बैठकीमध्ये पोलिस अधिक्षक यवतमाळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जास्तीत जास्त लोकांनी अपघातातील जखमीनां मदत करण्याबाबत आव्हान करण्यात आले. हि बैठक पोलिस अधिक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली या बैठकीला
उपविभागीय पोलिस अधिकारी  संजय पुज्जलवार, पोलिस निरीक्षक अजित राठोड जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा यवतमाळ वाहतुक उपशाखा अधिकारी तसेच अंमलदार हजर होते.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!