स्थानिक गुन्हे शाखा व मोर्शी पोलिसांची गुटखा तस्करावर संयुक्तिक कार्यवाई,गुटख्यासह १३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैद्यरित्या गुटख्याची तस्करी करणार्यास संयुक्तिक कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखा व मोर्शी पोलिसांनी आवळल्या मुसक्या,गुटख्यासह १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत….

मोर्शी(अमरावती)प्रतिनिधी – पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात गुटखा तस्करी करणा-या इसमांवर बारकाईने लक्ष देवून जास्तीत जास्त केसेस करुन गुटखा विक्रीवर आळा घालणे संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण तसेच पोलिस स्टेशन प्रभारी यांना आदेशीत केले होते





त्या अनुषगांने दि १९ जुलै २०२५ रोजी स्था.गु.शा. अमरावती ग्रामीण चे पथक पो.स्टे. मोर्शी हद्यीत पेट्रोलींग करित असतांना गोपनिय माहीती मिळाली की, मोर्शी ते वरुड रोडने इटिंगा कारने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटख्याची अवैद्यरित्या वाहतुक करुन येणार आहे.



अशा गोपनिय खबरे वरुन स्था.गु.शा. पथक मोर्शी ते वरुड रोडवरील माळू नंदीच्या पुलाजवळ सापळा लावून बसले असतां एक काळया रंगाची इटिंगा कार येत असतांना दिसली त्या इटिंगा कारला थांबुन पाहणी केली असता दोन इसम दिसून आले त्यापैकी चालक यांला त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव हाफिज खान साहेब खान वय ४२ वर्ष रा. माहूली जहागीर असे सांगितले त्यांचे इरटीगा कारची पंचासमक्ष तपासणी केली असता कारमध्ये प्रतिबंधीत सुगंधी गुटखा तंबाखू किं. ३,७१,२५०/-रु.चा माल त्यांच्या ताब्यातून मिळून आला. जो मानवी आरोग्यास व जिवीतास धोका करणारा सुगंधी गुटखा तंबाखू व वाहतुक करण्याकरिता वापरलेली एक काळया रंगाची इटिंगा गाडी कि.अं.९,५०,०००/रु. असा एकूण १३,२१,२५०/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच १) हाफिज खान साहेब खान वय ४२ वर्ष रा. माहूली जहागीर + ०१ यांना पो.स्टे. मोर्शी यांचे ताब्यात देवून त्यांचेवर गुटखाबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली आहे.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक.विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे,ठाणेदार पोलिस स्टेशन मोर्शी सुरज बोंडे यांचे नेतृत्वात पो.उप.नि. विशाल रोकडे व त्यांचे पथक पोहवा संतोष तेलंग, पोशी राजेश कासोटे, पोशी मारोती वैद्य, पोशी रमेश मुंडे, पोशी प्रदीप ईपर, चालक किशोर सुने  व डि.बी. पथक यांनी संयुक्ती रित्या केलेली आहे.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!