
२१ तोळे सोन्यासह अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद….
नाशिक शहर परीसरात घरफोडी करणारा सराईत व अट्टल गुन्हेगारास गुन्हेशाखा युनिट – २ ने केले जेरबंद,२१ तोळे सोने केले जप्त….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे बाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हेशाखेला आदेश दिलेले होते
त्याअनुषंगाने दिनांक ३१/०७/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट २ मधील पोहवा प्रकाश भालेराव व पोहवा शंकर काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्ड वरिल गुन्हेगार अजय वाघेला रा. सिन्नरफाटा, नाशिक ( फिरस्ता) याने नाशिक शहरात घरफोडी
केलेल्या असुन त्याचे कडे खुप सोने आहे सदरचे सोने विकुन तो पिकअप गाडी घेणार आहे



अशा मिळालेल्या माहीतीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सदरची बातमी सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांचे मार्गदर्शनाखाली सफौ विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, पोहवा प्रकाश भालेराव, शंकर काळे,, सुनिल आहेर यांनी सिन्नरफाटा, म. न. पा. दवाखान्याचे जवळ उभा असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय राजु वाघेला, वय-२६ वर्ष, सद्या रा. गामणे यांचे मळयात मखमलाबाद शिवार, नाशिक. मुळ रा. रावेर रेल्वे स्टेशनजवळ, बोर झोपडपटटी, ता. जि. जळगांव (फिरस्ता) यांस सापळा रचुन ताब्यात घेतले त्यास घरफोडी बाबत विचारपुस करता त्याने नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हददीतील १) उपनगर पो.स्टे गुरनं – ५५ / २०२४ भादंवि कलम ४५४, ३८० २) उपनगर पो.स्टे गुरनं – २०५ / २०२४ भादंवि कलम-४५४,३८० ३) इंदिरानगर पो. स्टे गुरनं – १७९ / २०२४ भादंवि कलम ४५४, ३८० प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयांची चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून नाशिक शहरातील ०३ घरफोडी सारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्याचे कडुन २१ तोळे सोने सह एकुन १२,०८,८००/- रू किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच आरोपीस पुढील कारवाईकामी उपनगर पोलिस स्टेशन येथे देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रशांत बच्छाव सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ कडील,सफौ विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, बाळू शेळके, पोहवा प्रकाश भालेराव, शंकर काळे, गुलाब सोनार, संजय सानप, सुनिल आहेर, प्रकाश बोडके, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, विजय वरंदळ, वाल्मीक चव्हाण, पोशि प्रवीण वानखेडे, चापोशि जितेंद्र वजीरे अशांनी केलेली आहे.




