गोरक्षकांनी पकडली कत्तलीकरीता जाणारी जनावरांची गाडी केली जनावरांची सुटका,पोलिसांनी लगेच केली मदत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धनज(वाशिम) ः प्राण्यांवरील अत्याचार संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिनियमांन्वये वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ अन्वये क्रूरपणे होणाऱ्या जनावरांच्या वाहतूक व बेकायदेशीर कत्तली, बेकायदेशीर गोवंश मांस बाळगणे किंवा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबत आरोपींवर वाशिम पोलीस दलातर्फे वेळोवेळी कारवाई केली जाते.त्याच पार्श्वभूमीवर दि.०७.१०.२०२३ रोजी सायंकाळी ०५.३० वा. ग्राम कामरगाव येथील ०४ गोरक्षक युवकांना शिवन वरून एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी पाठीमागून लाकडी पाट्या लावलेल्या अवस्थेत भरधाव वेगाने येतांना दिसली. त्यांना सदर गाडीतून गोवंशांची कत्तलीकरिता अवैधरीत्या वाहतुकीचा संशय आल्याने त्या गाडीचा पाठलाग करून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी बाबापूर बेंबडा शिवाडीच्या रस्त्याने काही अंतरावर जाऊन थांबली. त्या गाडीतील ०३ इसम हे बोलेरो गाडी जागीच सोडून पळून गेले. सदर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये अवघडलेल्या अवस्थेत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत ०६ बैल व एका पन्नीमध्ये जनावराचे कापलेले मांस मिळून आले. त्यामुळे सदर बोलेरो वाहन क्र.MH-30-BD-5131 पंचासमक्ष जप्त करून सदर आरोपींवर पोलिस स्टेशन धनज येथे अप.क्र.३१३/२३, कलम २७९, ४२९ भादंवि सहकलम ५, ५ अ, ५ क, ९ अ महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम १९७६ व ११ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून ०१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई  ठाणेदार पोलिस स्टेशन धनज योगेश ईंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मदन पुणेवार करीत आहेत

नागरिकांनी अश्याप्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्ष वाशिम किंवा DIAL 112 किंवा संबंधित प्रभारी पोलीस अधिकारी यांना माहिती द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.





 







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!