
अवैद्यरित्या एम.डी.ड्रग्स बाळगणाऱ्याला पांढरकवडा पोलिसांनी केली अटक
अवैद्यरित्या एम.डी.ड्रग्स बाळगणाऱ्याला पांढरकवडा पोलिसांनी केली अटक…
पांढरकवडा(यवतमाळ) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन पांढरकवडा पोलिसांचे पथक हे गस्तीस होते. गस्तीस असताना पोलिसांना माहिती मिळाली की, पोलीस ठाणे हद्दीत निर्मनुष्य ठिकाणी एक जण अवैद्यरित्या एम.डी. ड्रग्स विक्रीच्या उद्देशाने बाळगून आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.


या बाबत अधिक माहिती अशी की, दि.१४ डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन पांढरकवडा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस स्टेशन पांढरकवडा यांनी आरोपी नामे मोहम्मद जुबेर शाहीद अब्दुल खलील (वय २८ वर्षे), रा.मस्जीदवार्ड, पांढरकवडा यास सुराना जिनींगमधील एम.एस.ई.बी. कार्यालय, पांढरकवडा येथील निर्मनुष्य ठिकाणी अवैद्यरित्या एम.डी. ड्रग्स बाळगुन त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला आहे. अशा मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचुन त्यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अंगझडतीत ३.६१ ग्रॅम एम.डी. (मेथडॉन) अंमली पदार्थ कि.अं. ७००० रु, रंजनीगंधा फ्लेवर पान मसाला, एक अँड्रॉइड मोबाईल, रेल्वे टिकीट तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक पांढ-या रंगाची ॲक्टीवा क्र.एम.एच.२९ सी.ए. ७५१३ असा एकुण ९२,००० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे अप, क. १३६२/२०२३ कलम ८ (क) २१ (ब) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS) ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली असून पुढील तपास चालु आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पवन बन्सोड, अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागिय पोलिस अधिकारी,पांढरकवडा रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल माळवे, सपोनि आशिष गजभीये, पोउपनि योगेश रंथे, पोउपनि नितीन सुशीर, पोउपनि मनोज उघडे, पोलीस स्टाफ प्रमोद घोटेकर, रवि सिन्हें, महेश नाईक, राजु बेलयवार, सुर्यकांत गिते, गौरव नागलकर, विशाल वाढई, विकेश द्यावर्तीवार, कमलेश काकडे, राजेश सुरोशे यांनी केली असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर हे करीत आहेत.



