कळंब मध्ये छेड काढणाऱ्या मुलांना पिंक पथकाने दिली समज; पालकांचीही जबाबदारी

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कळंब मध्ये छेड काढणाऱ्या मुलांना पिंक पथकाने दिली समज; पालकांचीही जबाबदारी

धाराशिव (प्रतिनिधी) – कळंब शहरातील महाविद्यालय व कोचिंग क्लासेस च्या परिसरात सध्या सर्वत्र मुलीच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी पिंक पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. या पथकाकडे जवळपास २५ मुलींनी गुप्तपणे तक्रार केली, त्यामुळे आता मुली तक्रारी देण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. या वर तात्काळ कारवाई करत त्या मुलांना समज दिली आहे. या मध्ये पालकांचीही तेवढीच जबाबदारी असून, त्यांनी आपल्या मुला-मुलीला पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे.





महाविद्यालयीन व शाळेत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातुन येणा-या मुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. कोचिंग क्लासेस ची वेळ आणि गावाकडे जाणाऱ्या बसेस च्या वेळेचा ताळमेळ लागत नसल्यामुळे अनेक मुली या शहरातील भाड्याच्या खोलीत वास्तव्य करतात. या मुलींना टवाळखोरांच्या छेडछाडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र या मुलींना शिक्षण घ्यायचे आहे म्हणुन ही छेडछाड निमुटपणे सहन करावे लागत आहे. या संदर्भात घरच्यांना सांगितल्यावर आपले शिक्षण बंद केले जाईल या भितीपोटी कोणत्याही नातेवाईकांपुढे – घरी वाच्छता करत नाहीत. त्यामुळे हे टवाळखोर मुलांचे टोळके बिनधास्त छेडछाड करत असल्यामुळे मुली या शहरात वावरण्यास सुद्धा घाबरत असुन स्वतःला असुरक्षित समजु लागल्या आहेत. तसेच अनेक पालकांनी सुद्धा मुलींच्या छेडछाडीला कंटाळून मुलींचे शिक्षण बंद केलेले आहे.



टवाळखोर मुले मुलीची छेडछाड करतात, मात्र मुली निमूटपणे हा प्रकार सहन करतात, मागील काही दिवसांपासून पिंक पथक हे ॲक्टिव मोडवर असून या पथकातील अधिकारी हे मुलींना विश्वासात घेऊन काय अडचण आहे, कोण छेडछाड करते याबाबत विचारणा करतात, त्यामुळे जवळपास २५ मुलींनी मुले छेडछाड करीत असल्याचे सांगितले त्यावर तात्काळ कारवाई करत त्या मुलांना समज देण्यात आला आहे. याच प्रमाणे इतर मुलींनी छेडछाडीला न घाबरता पुढे येणे गरजेचे आहे. या साठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथक स्थापन करण्यात आलेले आहे. या मध्ये पोलीस उपनिरीक्षक वर्षा साबळे, रेश्मा ओव्हाळ या काम पाहत आहेत. या कारवाईमुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असले तरी तरूणांच्या पालकांनीही समुपदेशन करणे गरजेचे आहे. या मध्ये पालकांचीही तेवढीच जबाबदारी असून, त्यांनी आपल्या मुला-मुलीला पुरेसा वेळ दिला पाहिजे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!