कंटेनर मधुन गांजा तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कंटेनर वाहनातुन गांजा तस्करी करणारे सापडले स्थानिक गुन्हे शाखेच्या  तावडीत,४९५ किलो ६०० ग्रॅम गांजासह एकास केले गजाआड….

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण  हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ११/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर आळा घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस ठाणे बुट्टीबोरी हद्दीतून चंद्रपूर ते नागपूर रोडनी एका कंटेनर वाहन क्र. HR 55 /S 2346 मधुन अंमली पदार्थ (गांजा) ची वाहतुक होत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण  हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन बुट्टीबोरी परिसरात चंद्रपूर ते नागपूर रोड येथे नाकाबंदी दरम्यान कंटेनर क्र. HR 55 / S 2346 थांबवुन वाहनाची झडती घेतली असता कंटेनर वाहनात चालक आरोपी नामे –
१) शब्बीर जुम्मे खान वय – ३० रा मनपूर करमाला, जोगवा ता. रामगड जी अलवर (राजस्थान)





हा त्याचा सोबती
२) मूनवर आझाद खान वय २८ रा. शहापूर नगली ता नुह जी मेवात (हरियाणा)



याचे मदतीने कंटेनर वाहनामध्ये कॅबिनचे ड्रायव्हर सिटचे मागील भागाने कंटेनरला छुप्या पद्धतीने कप्पा तयार करून त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या एकुण १५ प्लास्टिकच्या बोरीमध्ये गुंगीकारक वनस्पती गांजा बाळगून वाहतूक करतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन



१) ४९५ किलो ६०० ग्रॅम किंमती ४९,५६००० /- रू.

२)कंटेनर वाहन क्र. HR-55 / S-2346 किंमती २०,००,००० / – रू. ३) दोन मोबाईल संच किंमती २०,००० /- रू.

असा एकूण ६९,७६००० /- रू. चा मुद्देमाल जप्त करून वरील दोन्ही
आरोपींना अटक करण्यात आली. अटक आरोपीताकडुन गाडीचा मालक ३) गाडी मालक

हाफिज जुमे खान रा. यमुना नगर (हरियाणा) असल्याचे व अंमली पदार्थ गांजा मुद्देमाल हा सुनिल नावाचे इसमाचा असुन दोन्ही आरोपीतांना गुन्हयात फरार दाखविण्यात आले आहे. अटक आरोपीतांनी चौकशीमध्ये वरील फरार आरोपींचे सांगण्यावरून
विशाखापट्टणम येथुन बिहार कडे घेवुन जात असल्याची माहिती दिली. आरोपीतांविरुद्ध पोलिस ठाणे बुट्टीबोरी येथे
कलम २०, २२ एन. डी. पी. एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्धेमाल, दोन आरोपी व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले असुन आरोपींचा दिनांक १५/०१/२०२४ पीसीआर घेण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही  पोलिस अधीक्षक  हर्ष पोद्दार (भा.पो.से), अपर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, बहुलाल पांडे पोलिस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मिलिंद नांदुरकर, संजय बांते, मयूर ढेकळे, सत्यशील कोठारे, पोलीस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे, पोलिस शिपाई राकेश तालेवार चालक पोलिस शिपाई आशुतोष लांजेवार,
सुमित बांगडे, सायबर सेलचे सतिश राठोड, मृणाल राऊत यांचे पथकाने पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!