
दरोडेखोराचे टोळीस नागपुर गुन्हे शाखेने केले जेरबंद…
दरोडेखोरांच्या टोळीला नागपूर गुन्हे शाखेने केली अटक…
नागपूर (शहर प्रतिनिधी)- दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना ३६ तासाच्या आत पकडण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या मध्ये त्यांनी दरोडेखोरांकडून नगदी ५, १०,०००/- रु. रोख, ६ मोबाईल, हिरो माईस्ट्रो वाहन क्र. एमएच ४० बीएम ९२४६ किं. ३५,०००/- रु. असा एकुण ५,९५, ०००/- रू. चा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अमीत चंद्रकांत दुरुगकर (वय ३४ वर्षे), रा.प्लॉट नं.२९ रोटकर ले आऊट न्यु ओमनगर, सुयश कॉल्व्हेंट जवळ, हुडकेश्वर रोड नागपुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या बाबत अधिक माहिती अशी की, नमुद घटना तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी त्यांचे आई सह घराचे खालच्या मजल्यावर हॉल मध्ये झोपले असताना घरातील रात्री अचानक इलेक्ट्रीक लाईट बंद झाल्याने व फिर्यादीचे आईला घराचे जिन्यावर काही तरी आवाज आल्याने फिर्यादीचे आईने फिर्यादीचा मोठा भाऊ स्वप्नील याला फोन केला व नंतर फिर्यादीला देखील आवाज दिला तेव्हा फिर्यादीने मुख्य दार उघडले असता मुख्य दाराच्या बाहेर ५ ते ६ अनोळखी इसम हातात तलवार व धारदार शस्त्र घेवून खाली बसलेले होते फिर्यादीने दार उघडताच त्या इसमांनी फिर्यादीने उघडलेल्या दाराला धक्का देवून फिर्यादीला घराचे आत लोटुन ते घरात घुसले त्यापैकी एका अनोळखी इसमाने हातात चाकु सारखे धारदार शस्त्राने फिर्यादीवर हल्ला केला. तेव्हा फिर्यादी स्वतःचा बचाव करीत असतांना उजव्या हाताने फिर्यादीने शस्त्र पकडले असता सर्व आरोपीतांनी मिळून फिर्यादीला खाली पाडुन त्यातील एका आरोपीने त्याचे जवळील तलवारीने फिर्यादीचे डावे हाताचे मनगटावर वार करून जखमी केले व फिर्यादीचे आईला पकडुन ठेवले. आरोपीतांनी म्हटले की, तुला आणि तुझ्या आईला मारून टाकील चुपचाप पडुन रहा. असे धमकावुन फिर्यादीला बेडरूम मध्ये घेवून जाऊन बेडरूम मधील लाकडी कपाटातील कापडी प्लॉस्टीक बास्केट चे मागे प्लॉस्टीकच्या पिशवी मध्ये ठेवले असलेले नगदी आठ लाख रूपये बळजबरीने काढून घेवून पळून गेले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून गुन्हा दाखल आहे

सदर गुन्हयाचे समांतर तपास करीत असतांना सपोनि. मयुर चौरसिया यांनी नागपूर शहरात लागलेले सि.ओ. सी चे कॅमरे तसेच खाजगी कॅमरे असे अंदाजे १५० ते २०० कॅम-याची तपासणी तसेच अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर करून व गुन्हे शाखेचे सायबर सेल ची विशेष मदत घेवून कट रचणारे मुख्य आरोपी नामे जयंत सतिश कांबळे याचा अतिशिताफीतीने शोध घेवून ताब्यात घेतले. त्यास गुन्हयाबाबत बारकाईने व सखोल विचारपुस केले त्यावर त्याने सांगीतले की, फिर्यादी याचे घरी मोठ्या प्रमाणात रूपये व सोन्याचे दागिणे आहे. अशी टिप मंगेश झल्के, सुमित घोडे यांचे कडुन प्राप्त करून डकैती साठी गुड उपल्बध करून देणारा शेख अमीन उर्फ अस्लम याचे सोबत संपर्क करून पाहिजे आरोपी इमरान खान, दानिश, फहीम चुहा व ईतर सोबत कट रचुन फिर्यादीचे घरी मध्यरात्री प्रवेश करून त्यांना शरत्राचे धाक दाखवुन किंवा त्यांचे वर हमला करून दरोडा टाकलेला आहे. व तेथुन प्राप्त दरोडयाची रकम आपसात वाटुन घेतलेली आहे.

सदर घटनेला अंजाम देण्याकरिता १ महिन्यापुर्वी रेकी व योजना सुरू असल्याचे आरोपी कडुन माहिती प्राप्त झाली आहे. या मध्ये जयंत सतिश कांबळे (वय २५ वर्षे), रा.अनंत लोखंडे यांचे घरी किरायाणे, मितीक्षा अपार्टमेंट, साई श्रध्दा पार्क, बेलतरोडी, बरडे ले आऊट, पो. ठाणे बेलतरोडी, नागपुर, निखील उर्फ हिमांशू दिनेश कैथवास (वय २४ वर्षे), रा. न्यु बौध्द विहार जवळ, राहुल नगर, सोमलवाड, वर्धा रोड, नागपुर, शेख अमीन उर्फ अस्लम वल्द शेख सत्तार (वय २१ वर्षे), रा.एसआरए कॉलनी, पो. ठाणे कपिलनगर नागपूर, अल्ताफ खान अहमद खान (वय- ५२ वर्षे), रा.एसआरए कॉलनी, नागपूर, मंगेश मोतीरामजी झलके रा.गजानन नगर, झोन चौक, हिंगणा रोड, सुमित वसंतराव घो,डे रा.वानाडोंगरी महाजनवाडी हिंगणा रोड नागपूर यांना अटक केली असून इमरान खान उर्फ राजा वल्दफ खान रा.एसआरए कॉलोनी, पो.ठाणे कपिल नगर, नागपूर, दानिश रा.रेल्वे क्रॉसिंग जवळील
सोड्पट्टी, नागसेनवन, पो.अधिकारी यशोधरा, अब्दुल फहीम उर्फ चुहा हनीफ शेख आणि ईतर ०२ आरोपीसह यांचा शोध सुरू आहे.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, सह पोलिस आयुक्त श्रीमती अश्वती दोरने, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, पोलिस उप आयुक्त अर्चित चांडक (डिटेक्शन), सहायक पोलिस आयुक्त अभिजीत पाटील, गुन्हे शाखा, नागपुर शहर यांचे मार्गदर्शनात सदरची कार्यवाही सहायक पोलिस निरीक्षक मयुर चौरसिया, पो.हवा राजेश देशमुख, पो.हवा सुनिल ठवकर, रवि अहीर, प्रशांत गभणे, श्रीकांत उईके, नापोअ प्रविण रोडे, चेतन पाटील, पो.अ आशिष वानखडे, पो.अं निलेश श्रीपात्रे, चालक सुधिर पवार, विशेष सहकार्य सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विवेक झिंगरे, शेखर राघोते, अनंता क्षीरसागर, पराग ढोक, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


