नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटख्यासह दिड कोटीचा मुद्देमाल….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने इगतपुरी पोलिस ठाणे हद्दीत पकडला परराज्यातुन आलेला व  महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत अवैध गुटख्यासह दिड कोटींचा मु‌द्देमाल…







ईगतपुरी(नाशिक)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई करण्याचे आदेशीत केले होते.त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आले होते



तरीसुध्दा काही ईसम गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात करतात अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन दि. १० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळचे सुमारास समृध्दी महामार्गाने मुंबई बाजूकडे काही संशयीत इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने जाणार आहे अशा गोपनीय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांनी . सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदगाव सदो शिवारात समृध्दी महामार्गाचे एक्झीट टोल परिसरात छापा टाकून, टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक आर. जे.११.जी.सी.००९१ यास थांबवुन त्याची तपासनी केली असता यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा इसम १) अरमान शोहराब खान, वय २०, रा. फिरोजपुर डेहेर, ता. नगीना, जि. नुह मेवात, राज्य हरियाणा यास ताब्यात घेतले.



सदर इसम हा फुटवेअर कंपनी व प्लॅस्टिक टॉयज् कपंनीचे नावाचे बनावट बिल तयार करून चोरटया रितीने गुटख्याची वाहतुक करतांना मिळून आला त्याचे कब्जातून एस.एच.के., आर. रॉयल १०००, आशिकी, सुपरकॅश गोल्ड, व्ही.सी.५, डी.बी. सिग्नेचर कंपनीचे नावांचे सुगंधीत गुटख्याचा १,१८,४४,०००/- रूपये किंमतीचा अवैध गुटखा, टाटा कंपनीची ट्रक क्र आर जे ११.जी.सी.००९१ व इतर साहित्य असा एकुन  १,५३,५४,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील ताब्यात घेतलेला इसम हा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठयास प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत /स्वादीष्ट तंबाखू, पानमसाला, सुगंधीत स्वादीष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे, हे माहिती असतांना देखील स्वतःचे फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगातांना मिळून आले असून त्याचेविरूध्द इगतपुरी पोलिस ठाणेस गुरनं २७६/२०२४ भा.न्या.सं. कलम १२३, ३१८(४), ३३६(१), ३३६(३), ३४०(२), २७५, २७४, २२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयात आरोपी अरमान खान यास अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांचे पथक करीत आहे. यातील आरोपी हा गुटख्याची अवैधरित्या तस्करी करून कोणत्या ठिकाणांवर गुटख्याचा पुरवठा करणार होता, तसेच सदर गुटख्याचे पुरवठादार व खरेदीदार कोण आहेत याबाबत पोलीस पथक कसोशिने तपास करीत आहे.

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोहवा संदिप नागपुरे, मेघराज जाधव, प्रकाश कासार, नितीन डावखर, मनोज सानप, रवि गवळी यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!