‘श्रेष्ठ न्यूज’च्या नावाखाली सरपंचांना खंडणी; भोपाळमधील ४ महिला आरोपींना अटक!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


‘श्रेष्ठ न्यूज’च्या नावाखाली सरपंचांना फोन करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नागपूर ग्रामीण पोलिसांची भोपाळमध्ये धडक कारवाई, ४ महिला आरोपींना अटक!

नागपूर:



‘श्रेष्ठ न्यूज’ या नावाचा वापर करून नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील काही महिला सरपंचांना फोनद्वारे पैशांची मागणी करणे आणि पैसे न दिल्यास बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्याची धमकी देण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे मोठी कारवाई करत ४ महिला आरोपींना अटक केली असून, एका आंतरराज्यीय खंडणी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.



फसवणुकीची आणि खंडणीची पद्धत

  • तक्रारदार: सौ. मीना सुरेशसिंग सूर्यवंशी (सरपंच, गटग्रामपंचायत गोधनी गायमुख, ता. नरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार उघडकीस आला.



  • धमक्या आणि वसुली: स्वातंत्र्यदिनाच्या जाहिरातीच्या नावाखाली ३,००० रुपयांची मागणी केली जात असे. पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली जाई. जुनोना फुके येथील सरपंच प्रभा ओमप्रकाश गोतमारे यांच्याकडून ऑनलाईन ५०० रुपये उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली होती.

 भोपाळमधील अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश:

नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मध्य प्रदेशातील भोपाळ येथे शोध घेतला. तपासात भोपाळ येथे ३ वेगवेगळ्या ठिकाणी अवैध कॉल सेंटर चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले:



  1. हर्षवर्धन नगर: येथे २७ मुली कामावर होत्या.

  2. निशाक पुरा: येथे ४ मुली कामावर होत्या.



  3. एम.पी.-१ नगर: येथे ४ मुली कामावर होत्या.

या तिन्ही केंद्रांवर एकूण ३५ मुलींना वेतनावर कामावर ठेवण्यात आले होते. त्यांना वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी दिली होती.

 ८ राज्यांत पसरलेलं जाळं:

  • ‘महापंचायत पोर्टलचा’ वापर करून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या ८ राज्यांतील सरपंच व ग्रामस्थांचे मोबाईल क्रमांक गोळा करण्यात आले होते.

  • या क्रमांकांचे ६१८ registre (रजिस्टर्स) तयार करण्यात आले होते.

  • संबंधित राज्यांतील भाषा जाणवणाऱ्या मुलींमार्फत सरपंचांना फोन करून जाहिरातीच्या नावाखाली पैशांची मागणी केली जाई आणि कथित गैरव्यवहार छापण्याची धमकी देऊन खंडणी वसूल केली जाई.

 अटक केलेल्या मुख्य आरोपी महिला:

१. मोनिका लालसिंग सूर्यवंशी (वय २८, रा. राजगड, म.प्र.) – मुख्य आरोपी

२. नेहा लालसिंग सूर्यवंशी (वय २३, रा. राजगड, म.प्र.)

३. अक्षरा मिलिंद अरक (वय २१, रा. भोपाळ, म.प्र.)

४. कोमल मोहन मोरे (वय २३, रा. भोपाळ, म.प्र.)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹ ७,२९,२६०/-):

  • ५४ मोबाईल फोन (किंमत ₹ ५,००,०००/-)

  • २ लॅपटॉप, २ कॉम्प्युटर व १ प्रिंटर (किंमत ₹ २,१५,०००/-)

  • ८ राज्यांतील सरपंच/ग्रामसेवकांचे मोबाईल नंबर असलेली ६१८ रजिस्टरे (किंमत ₹ ९,२००/-)

  • ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’चे प्रिंटेड पॉकेट, पर्चे, येस बँकेचे स्कॅनर असलेल्या पावती स्लिप्स आणि चेकबुक

  • तक्रार आणि पोलिसांची तात्काळ दखल:

    दिनांक ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी लोहारी सावंगा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान काही महिला सरपंचांनी याप्रकरणी तक्रार केली.  यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  हर्ष ए. पोद्दार यांना या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, नरखेड पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!