
माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस दलाने केले जप्त

गडचिरोली पोलिसांचे मोठे यश: माओवाद्यांचे जंगलात पुरून ठेवलेले घातक शस्त्रास्त्र आणि स्फोटक साहित्य हस्तगत
गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा विळखा संपुष्टात येत असून येथील नागरिक आता दहशतीपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. असे असले तरी, भूतकाळात सुरक्षा दलांना लक्ष करण्यासाठी आणि घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी माओवाद्यांनी दुर्गम जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटक साहित्य गोपनियरित्या जमिनीखाली लपवून (पुरून) ठेवले होते. निवडणुका किंवा नक्षल सप्ताह यांसारख्या प्रसंगी सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी या साहित्याचा वापर केला जाई. या पार्श्वभूमीवर, गडचिरोली पोलीस दलाने गुप्त माहितीच्या आधारे १७ नोव्हेंबर २०२६ रोजी एक मोठी आणि प्रभावी कारवाई करत हा संपूर्ण शस्त्रसाठा जमिन्मदूल केला आहे.
कारवाईचे ठिकाण आणि पार्श्वभूमी
-
गोपनीय माहिती: गडचिरोली पोलीस दलास अत्यंत विश्वासार्य माहिती मिळाली होती की, पोस्टे गर्देवाडा हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य लपवून ठेवले आहे.
-
छापा व शोध मोहीम: मिळालेल्या माहितीची तत्काळ दखल घेत, पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष अभियान पथक (गडचिरोली व प्राणहिता) च्या एकूण ०५ तुकड्या आणि बीडीडीएस (BDDS) ची ०२ पथके तातडीने संबंधित जंगल परिसरात शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आली.

घटनास्थळावरून जप्त केलेले माओवादी साहित्य (जप्तीची यादी)
बीडीडीएस आणि विशेष अभियान पथकाच्या जवानांनी हिक्केर जंगलाची कसून तपासणी केली असता, जमिनीखाली पुरून ठेवलेले खालीलप्रमाणे घातक साहित्य व शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात यश आले:

| अ.क्र. | जप्त केलेले साहित्य / शस्त्रास्त्रे | नग / संख्या |
| १ | १२ बोर रायफल |
०१ नग ![]() |
| २ | एअर गन रायफल |
०१ नग |
| ३ | ३०३ रायफलचे जिवंत काडतूस |
१३ नग ![]() |
| ४ | ८ एम.एम. जिवंत काडतूस |
१८ नग |
| ५ | ग्रेनेड (बॉम्ब) |
०३ नग ![]() |
| ६ | बिजीएल (BGL) सेल |
१८ नग |
| ७ | बिजीएल लाँचर |
०२ नग |
| ८ | डेटोनेटर |
१० नग |
| ९ | सुराका सेल |
२१ नग |
| १० | होंडा कंपनीचे इलेक्ट्रिक जनरेटर |
०१ नग |
| ११ | वायर बंडल व इतर नक्षलवादी साहित्य |
२२ नग व मोठ्या प्रमाणावर साहित्य |
यशस्वी मोहिमेचे नेतृत्व व मार्गदर्शन
ही अत्यंत धडाकेबाज कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष देखरेख ठेवली:
-
अपर पोलीस अधीक्षक (अभियान): कार्तिक मधीरा
-
अपर पोलीस अधीक्षक: गोकुल राज जी.
-
अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता): हर्षवर्धन बि.जे.
-
पोलीस उप-अधीक्षक (अभियान): सुनिल उईके
या सर्व अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक (गडचिरोली, प्राणहिता, इंट सेल) तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी ही मोहीम यशस्वी केली. या उल्लेखनीय व साहसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या सर्व पोलीस अधिकारी व जवानांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.





