वाहनचालकांना धमकाऊन हल्ला करणारे गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

रस्त्यावरील वाहने अडवुन जबरीने काचा फोडुन खुनी हल्ला करणारी टोळीस गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात….                          

नाशिक (शहर प्रतिनिधी) – रस्त्यावरील वाहनांना आडवून वाहनचालकांना धमकावून वाहनाच्या काचा फोडून लुटणाऱ्या दारुच्या आहारी गेलेल्या तरुन टोळक्यास मिळालेल्या गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करण्यात गंगापूर पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी जय गजभिये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०७, ३०८,३४१, ३३६, १४३,१४८,१४९, ४२७, ५०४, ५०६,३४ गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत अधिक माहिती अशी की, गंगापुर पोलिस स्टेशन येथे तक्रारदार जय चंद्रकांत गजभिये याने तक्रार दिली की (दि.१३फेब्रुवारी) रोजी रात्री १०:३५ वा चे दरम्यान हुदाई कार क्र.एमएच-१५-एचक्यु-०७१० हिच्याने त्याचे मित्र कुशल अरुण भगत व ओमकार वाळुंज असे हिचेने गिरणारे रोडने नाशिककडे येत असतांना गंगापुर गाव जकात नाक्याजवळ त्यांच्या गाडीच्या समोर अनोळखी इसमांनी आडवे होऊन गाडी अडवुन त्यांचेशी हुज्जत घालुन गाडीची पाठीमागील बाजुच्या काचेवर दगड मारुन काच फोडुन नुकसान केले त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारला असता नमुद इसमापैकी एकाने त्याचेकडील चाकुने प्राणघातक हल्ला  करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी यांनी सदरचा वार चुकवुन त्या ठिकाणाहुन निघुन पोलिस ठाणे येथे आले. त्याचवेळी इसम नामे मयुर रघुनाथ मोरे रा. मुपो. खंबाळे (त्रंबकरोड येथे मळयात) ता.त्रंबकेश्वर, जि.नाशिक यांची टाटा व्हिस्टा कार क. एमएच-१५-डीएम-८२३२ व विजय नथु रसाळ रा.फ्लॅट नं.६, आकार रेसीडेन्सी, धुवनगर, गंगापुर शिवार, नाशिक यांचा टेम्पो क्र. एमएच-१६-एई-४८५२ यांचे देखील नमुद इसमांनी दगड मारुन काच फोडलेबाबत त्यांनी माहिती दिल्याने फिर्यादी जय गजभिये यांची तक्रार नोंदवुन घेऊन नमुद घटनास्थळी गुन्हे शोध पथकाने लागलीच भेट देऊन नमुद अज्ञात इसमांची नावे निष्पन्न केली. त्या बाबत गंगापुर पोलिस स्टेशन गुरनं. ३४/२०२४ भादविक.३०७, ३०८,३४१, ३३६, १४३,१४८,१४९, ४२७, ५०४, ५०६,३४ गुन्हा दाखल करण्यात आला होता.



त्या अनुषंगाने गंगापुर पोलिस स्टेशनकडील गुन्हेशोध पथकाचे पोउनि. मोतीलाल पाटील व पथकाने गुप्तबातमीदारामार्फत माहिती घेऊन त्या आधारे नमुद आरोपीतांचा शोध घेतला असता ते कोकणगांव ता.दिंडोरी येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन गंगापुर पोलिस स्टेशनचे पोउनि. मोतीलाल पाटील, पोहवा.गिरीश महाले, रवि मोहिते, पोशि मच्छिंद्र वाकचौरे,सोनु खाडे,गोरख साळुंके,  थविल असे रवाना होवुन त्याचा कोकणगांव भागात शोध घेतला असता



१) अनिकेत उर्फ अंडया पप्पु शार्दुल (वय-१९ वर्षे), रा.राजीवनगर, गोवर्धन गांव, नाशिक

२) प्रतिक विष्णु जाधव (वय-१९ वर्षे), रा.मोतीवाला कॉलेजसमोर, दत्तमंदीर, शिवाजीनगर, नाशिाक

३) विजय दादु खोटरे (वय-१९ वर्षे), रा.विठ्ठल रुक्मिणी मंदीरासमोर, भवर टॉवर, शिवाजीनगर, नाशिक

४) कपिल उर्फ चिंटु बाळु गांगुर्डे (वय-२१ वर्षे) रा.मोठा राजवाडा, गंगापुर गांव, नाशिक

५) रोहित उत्तम वाडगे (वय-१९ वर्षे), रा.चावडीजवळ, मोठा राजवाडा, गंगापुर गांव नाशिक

हे मिळुन आल्याने त्यांना गंगापुर पोलिस स्टेशन गुरनं. ३४/२०२४ भादविक. ३०७,३०८,३४१,३३६,१४३, १४८, १४९, ४२७,५०४, ५०६,३४ या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचे इतर साथीदारांचा शोध चालू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-१, किरणकुमार चव्हाण, सहा. पोलिस आयुक्त, सरकारवाडा विभाग सिध्देश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलिस उप निरीक्षक मोतीलाल पाटील, पोहवा. गिरीष महाले, रविंद्र मोहिते, गणेश रहेरे, नापोशि, मच्छिंद्र वाकचौरे, पोशि सोनु खाडे, गोरख साळुंके, सर्व नेमणुक गंगापुर पोलिस स्टेशन यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!