शैक्षणिक परीसरात गुंडगिरी करणारा सराईत गुन्हेगारावर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ट्युशन एरियात गुंडगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास ‘एमपीडीए’ कायद्यान्वये केले स्थानबद्ध…

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी तसेच लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत लातूर शहरातील इसम पंकज श्यामसुंदर पारिख, वय 25 वर्ष, राहणार भोकरंबा तालुका रेनापुर. सध्या राहणार पशुपतिनाथ नगर, लातूर याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.





एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. पंकज श्यामसुंदर पारीख याला ‘एमपीडीए’ कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी छत्रपती संभाजी नगर येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक  सोमय मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील एमपीडीए नुसार करण्यात आलेली ही सहावी कारवाई आहे.
कुख्यात गुन्हेगार पंकज श्यामसुंदर पारिख, याच्या विरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे एकूण 11 गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये शस्त्रासह शरीराविरुद्ध चे 5 गंभीर गुन्हे, मालमत्ता चोरी करण्याचे 2 गुन्हे, भारतीय हत्यार कायद्यान्वये 3 गुन्हे, तसेच खंडणी बाबतचा एक गुन्हा असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तसेच तो ट्युशन एरियामध्ये फिरून गुंडगिरी करण्याच्या सवयीचा होता त्यामुळे जनसामान्यात त्याची भीती होती. त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर)भागवत फुंदे, पोलिस ठाणे एमआयडीसी चे पोलिस निरीक्षक, साहेबराव नरवाडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे मार्गदर्शनात एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, पोहवा विष्णू वायगावकर, दत्तनगिरे यांनी परिश्रम घेवून प्रस्ताव तयार करुन मा.जिल्हाधिकारी यांचे कडे मंजूरी साठी पाठविला होता.  सदर प्रकरणी विशेष पथकाचे पोलिस अमलदार अर्जुन राजपूत, बेल्लाळे, युवराज गिरी, मुन्ना मदने, राजेश कंचे, गणेश साठे, संतोष देवडे, संतोष खांडेकर, यांनी नमूद आरोपी ताब्यात घेण्यासाठी मदत केली. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर करुन.सदर आरोपीची 23 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हर्सूल मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.



 







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!