
पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा स्पा च्या नावाखाली चालणार्या देहविक्री च्या धंद्यावर छापा..,,
पोलिस आयुक्तांचे विशेष सि.आय.यु. पथकाने स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रंकेटचा केला पर्दाफाश…


अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल
दि.(३०) रोजी पोलिस आयुक्तांचे सी.आय.यु.या विशेष पथकाला गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक माहीती प्राप्त झाली की, राजापेठ येथील समर्थ हायस्कुल समोर असलेलेल्या पॅन्टालुन्स मॉल मधील तिस-या माळ्यावर ऑशीएनिक स्पा सेंटर येथे
स्पा च्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालविला जात आहे. अशा खात्री लायक माहीती वरुन वरीष्ठांचे परवानगीने सदर रेड
कामी बनावटी ग्राहक यास तयार करुन त्याला सदरची बाब समजावुन सदर ठिकाणी पाठविले तसेच पथकासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता त्या ठिकाणी मुलगा मुलगी समागम करीत असतांना दिसुन आले. वरुन त्यांना ताब्यात घेवुन
काऊंटरवरील आरोपी नामे गुलशन ब्रिजेश सिंग वय 24 वर्ष रा. चंदेरी, ता. नया खेडा, जि. अशोक नगर म प्र याच्या जबळुन बनावट ग्राहकाला दिलेले नोटा मिळुन आल्या तसेच भारत घनश्याम जाधव वय 45 वर्ष रा. करंजी, ता. मानोद जि. परभणी हा स्पा मॅनेजरच्या मदतीस आढळुन आला वरुन इतर रुमची पाहणी केली असता दुस-या रुम मध्ये दुस-या पिडीत महिले सोबत आरोपी नामे सुमेय रामेश्वर शेंडे वय 31 वर्ष रा. शेगाव नाका अमरावती . हा सुद्धा
समागम करतांना मिळुन आला. त्या व्यतिरीक्त सदर स्पा मध्ये इतर पाच मुली देह व्यापाराच्या व्यवसायाकरीता त्याचा वापर करीत असल्याचे त्यांच्या विचारपुस वरुन स्पष्ट झाले त्यांच्या ताब्यातुन नगदी एकुन 1,28,500/- रु. तसेच एक लॅपटॉप, आय पँड, 4 मोबाईल व इतर साहीत्य असा एकुन 03,04,970/- रु. चा मुद्देमाल मिळुन आला,वर नमुद आरोपी तसेच सदर स्पा मालक हे कोलकत्ता, छत्तीसगढ, राजस्थान, मुंबई, पुणे येथुन मुलींना अमरावती शहरात आणुन त्यांच्या कडुन स्पा सेंटर च्या नावाखाली देह व्यवसाय चालवित असल्याचे स्पष्ट झाल्याने नमुद आरोपी विरुद्ध कलम 3,4,5 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलिस स्टेशन राजापेठ करीत आहे
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त अमरावती शहर,परीमंडळ २, गणेश शिंदे,पोलिस उपायुक्त गुन्हे कल्पना बारावकर, पोलीस उपायुक्त परीमंडळ १ सागर
पाटील,सहा पोलिस आयुक्त,राजापेठ विभाग जयदत्त भवर, सहा. पोलिस आयुक्त,गुन्हे शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रेखा लोंढे क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट मधील प्रभारी स. पो. नि. महेन्द्र इंगळे,पोहवा. सुनिल लासुरकर, ना.पो.शि. जहीर शेख, अतुल संभे, पो. शि. राहुल ढेंगेकर, विनोद काटकर यांनी
केली आहे.



