
खुनाचा बनाव करणाऱ्यास नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन केला खुनाचा उलगड…
सहकार्याचा खुन करुन त्याचा बनाव करणाऱ्याच्या नाशिक शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,पोलिस ठाणे सातपुर,अंबड तसेच गुन्हे युनीट १ व २ ची संयुक्तिक कामगिरी….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सातपुर पोलिस ठाणे येथील गु.र.क्र. 083/2024 भादंवि कलम 302 महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द दिनांक 01-04-2024 रोजी गुन्हा दाखल केला होता. सदरच्या गुन्ह्यामध्ये काहीही पुरावा नसल्याने गुन्हा उघड करण्याचे खडतर आव्हान पोलिसांसमोर होते.पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त, परिमंडळ – 2 मोनिका राऊत,सहा. पोलिस आयुक्त, अंबड विभाग शेखर देशमुख,यांनी गुन्हा उघड करण्यासाठी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या.


वरिष्ठांचे आदेशान्वये सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सातपूर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक, गुन्हे शाखा युनिट 1, गुन्हे शाखा युनिट 2 व अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक मधील अधिकारी व अंमलदार यांचे प्रयत्न चालू होते. घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज, ज्या ठिकाणी म्रुतक व संशईत ईसम काम करत होते त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले.तसेच म्रुतकासोबत राहणारे त्याचे इतर सहकारी यांच्याकडे केलेली चौकशी व गुप्त बातमीदारांकडून काढलेली माहिती यांच्या आधारे सदरचा गुन्हा संशयित इसमाबाबत मिळालेल्या बातमीच्या आधारे म्रुतकाबरोबर
राहणारा त्याचा कामावरील नातेवाईक 1) ईश्वर शेर सार्की, वय 20 वर्षे, मूळ राहणार हाट, गाव पालिक – अजयमेरू, जिल्हा – डडेलधुरा, नेपाळ याने त्याचा गावाकडील ओळखीचा इसम 2) प्रकाश गोविंदबहादूर शेटी, वय 42 वर्षे, मूळ राहणार हाट, गाव पालिक अजयमेरू, जिल्हा – डडेलधुरा, नेपाळ याच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. म्रुतक महेंद्र प्रकाश सार्की, वय 22 वर्षे याची मैत्रिण सोबत आरोपी नं. 1 ईश्वर शेर सार्की,याचे फोन कॉल व
चॅटींग करीत असल्याचे मयतास माहित झाल्याने मयताने त्यास मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरुन म्रुतकाचा कायमचा काटा काढण्यासाठी आरोपी नं. 1 1) ईश्वर शेर सार्की,याने दिनांक 01-04-2024 रोजी त्याचे रुममधील साथीदार झोपी गेल्यानंतर मध्यरात्री 02.30 वाजे सुमारास रुममधील भाजी कापण्याची धारदार सुरी घेवुन म्रुतक त्याचे मैत्रिणी सोबत इमारतीच्या टेरेसवर फोन वर बोलत असतांना पाठीमागुन जावुन आरोपी नं.1 ईश्वर शेर सार्की, याने त्याचा गळा चिरुन इमारतीचे टेरेसवरुन फेकून दिले होते.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त, परिमंडळ – 2 मोनिका राऊत,सहा. पोलिस आयुक्त, अंबड विभाग शेखर देशमुख सा., यांचे मार्गदर्शनाखाली सातपुर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन कनियन माछरे, गुन्हे शाखा युनिट 1 चे मधुकर कड व गुन्हे शाखा युनिट 1 चे विद्यासागर श्रीमनवार, सातपूर पो.ठाणेचे विश्वास पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे),पोलिस उप निरीक्षक रोहीत गांगुर्डे व सातपूर पोलिस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार, गुन्हे शाखा युनिट 1 व 2 चे अधिकारी व अंमलदार तसेच अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार अशांनी केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास पाटील हे करीत आहेत.



