लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सावंगी पोलिसांनी केलेल्या विविध कार्यवाहीचा आलेख..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडुन करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधक कार्यवाही…..

सावंगी मेघे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील विविध गावातील अवैध दारू विक्रेते, सराईत गुन्हेगार, शरीराविरूध्दचे गुन्हेगार, तंबाकु विक्रेते यांचेवर धडक कार्यवाही करून विविध गुन्हयामध्ये त्यांना अटक करण्यात आली.





दिनांक 16.03.2024 रोजी भारतीय निवडणूक आयोग यांचे कडून आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आली.त्याअनुषंगाने आगामी होवू घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणूक 2024 लक्षात घेता निवडणूक हया निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभनमुक्त वातावरणात पार पडावयाचे या उद्देशाने सदर आचार संहिते दरम्यान पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडून महाराष्ट्र दारूबंदी कायदयाअंतर्गत विविध कलमान्वये 125 कार्यवाही करण्यात आल्या व त्यामध्ये 19,44,240/- रू किं. मुददेमाल जप्त करण्यात आला असुन 30582 लिटर दारू व मोहासडवा नाश करण्यात आला असुन एकुन 160 आरोपी यांचे वर कार्यवाही करण्यात आली आहें



तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 अन्वये 24 प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आल्या असुन मा. उपविभागीय अधिकारी वर्धा यांचे बॉड घेण्यात आले आहे.पोलिस स्टेशन हदीतील सराईत व शारीराविरूदध चे गुन्हेगार याचे वर सी.आर.पी.सी. कलम 110 अन्वये 32 कार्यवाही करण्यात आली असुन त्याचे विरूदध मा. विशेष कार्यकारी ,वर्धा तथा पोलिस निरीक्षस स्थागुशा. वर्धा याचे
कडुन बॉड घेण्यात आले. सी. आर. पी. सी. कलम 107 अन्वये 126 कार्यवाही करण्यात आली असुन त्याचे विरूदध कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार वर्धा याचे कडुन  बॉड घेण्यात आले.तसेच हत्यार जवळ बाळगण्यारे याचे वर भारतीय हत्यार कायदयाचे विविध कलमा अन्वये 8 कार्यवाही करण्यात आले असुन 10 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.



आचार सहिता दरम्याण मा. न्यायालयाकडुन विविध गुन्हयातील प्राप्त झालेल्या 76 पकड वारंड मधील 76 आरोपींना अटक करण्यात आली असुन जेल मध्ये रवाना करण्यात आले आहे. पोलिस स्टेशन हद्दीतील मौजा पालोती येथील सराईत शरीराविरूदध गुन्हे करण्याचे सवईचा गुन्हेगार नामे लक्ष्मण पुडलिक मडावी रा. पालाती याचे वर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 56 अन्वये 3 महिन्याकरीता तडीपार करण्यात आले आहे.

मौजा सालोड हिरापुर, ता. जि. वर्धा येथे मोठया प्रमाणात देशी, विदेशी तसेच गावठी मोहा दारूची अवैधरीत्या विक्री तसेच कच्चा मोहा रसायन सडवा तयार करून गावठी मोहा दारूची हातभट्टी चालवीणारी कुख्यात दारूविक्रेती महिला  शालू सुधीर खोब्रागडे उर्फ शालू सागर येरेकार वय 47 वर्ष रा. सालोड हिरापुर हिचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा सन 1949 अन्वये सन 2016 ते 2024 पावेतो एकुण 77 गुन्हयांची नोंद आहे.तिच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये प्रलंबित  स्थानबध्द प्रस्तावाचा पाठपुरावा  करूण कलम 3 अन्वये 1 वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आले असुन मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे दाखल करण्यात आले आहे.तसेच पोस्टे हदिदतील अवैध धंदे चालविचारे याचे सुदधा नावाची यादी तयार असुन त्याचे वर सुदधा हदपार व स्थानबध्द कार्यवाही करण्याची तजविज ठेवण्यात येत आहे.

पोलिस स्टेशन सांवगी मेघे हद्दीतील दारूविक्रेते यांना सांवगी मेघे पोलीस स्टेशन कडुन समज देण्यात आली आहे कि, निवडणुक कालावधीत दारूविक्रीमुळे निवडणुकिस प्रभावित करणारा किवा आचारसंहीता भंग करणारा कोणताही गुन्हा घडल्यास संबंधीत  विक्रेत्यास दाखल झालेल्या गुन्हयात सहआरोपी करण्यात येईल याची नोद घ्यावी





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!