गोवंशीय जनावरे चोरणार्या टोळीस गुन्हे शाखेने यवतमाळ येथुन घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोवंशीय जनावरे चोरणार्या सराईत टोळीस  स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ येथुन घेतले ताब्यात…

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती जिल्हयात विशेतः ग्रामीण भागात दिवसे दिवस पाळीव गोवंश जातीय जनावरे चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले होते. अशातच दिनांक २९/०७/२०२४ रोजी पोलिस स्टेशन दत्तापुर(धामणगाव) शहर हद्दीतुन रात्रीचे सुमारास गोवंश चोरी गेल्याची घटना घडली असता सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधिक्षक यांनी सदर गोवंश चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीस निष्पन्न करून त्यांना अटक करून गोवंश चोरीचे गुन्हयांना आळा बसविण्या बाबत स्था.गु.शा.. यांना आवश्यक मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.





त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सागर हटवार व त्यांचे पथकाने सदर गुन्हयांचा समांतर तपास सुरु केला. सदर गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना पथकास माहीती मिळाली की, यवतमाळ येथील राहणारा आशीक शहा हसन शहा याने त्याचे काही साथीदारासह मिळून धामणगांव रेल्वे येथून गोवंश चोरून यवतमाळ येथे विकले आहेत यावरून सदर पथकाने त्वरीत
यवतमाळ येथे जावुन मोठ्या शिताफीने आशीक शहा हसन शहा यांस ताब्यात घेवून त्या गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास आणखी विश्वासात घेवून कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार १) शेख असरार शेख अकबर, वय ३२ वर्ष, रा. तायडे नगर, यवतमाळ २) समीर खान ईस्माईल खान, वय २८ वर्ष, रा. अशोक नगर, यवतमाळ ३) जावेद अहेमद अब्दुल कुरेशी, वय ३९ वर्ष, रा. अशोक नगर, यवतमाळ यांचे मदतीने सदर गुन्हा केल्याचे सांगीतले. वरुन सदर पथकाने नमुद आरोपींचा यवतमाळ येथे शोध घेवून त्यांना शिताफीने जेरबंद केले.



सदर आरोपींना आणखी गुन्हयांबाबत विचारपुस केली असता
त्यांनी पोलिस स्टेशन दत्तापुर येथे अप क्रमांक ७४ /२४, २०८/२४, ३३१ / २४ कलम ३७९ भादवि तसेच पो.स्टे चांदूर रेल्वे येथे अप क्रमांक ५५३/२३, १०३ / २४ कलम ३७९ भादवि व पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर येथे अप क्रमांक ८२/२४ कलम ३७९ प्रमाणे गोवंश चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. आरोपींनी गुन्हयात वापरलेली झायलो
गाडी ही पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे गोवंशचारीचे गुन्हयात जप्त आहे. नमुद आरोपीं कडून आणखी गुन्हयाची उकल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तपास पो.स्टे. दत्तापुर हे करीत आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोउपनि सागर हटवार, श्रेपोउपनि मुलचंद भांबुरकर, पोलिस अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, पो.स्टे. सायबर येथील अंमलदार चेतन गुल्हाने, रितेश वानखडे, चालक अंमलदार शाम मते, यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!