
अवैधरित्या देशी दारुची विक्री करणारा कुऱ्हा पोलिसांचे ताब्यात…
विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्यास कुऱ्हा पोलीसांनी केले जेरबंद,४ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
कुऱ्हा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि. (१५) ॲागस्ट २०२४ रोजी कुऱ्हा पोलिसांचे पथक पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकास गोपनीय माहीती मिळाली की ग्राम पंचायतीचे बाजुला एक ईसम अवैधरित्या दारुचा व्यवसाय करतोय


अशा मिळालेल्या गोपनीय बातमीवरून कुऱ्हा येथील ग्राम पंचायत च्या बाजूला छापा कार्यवाही केली असता चेतन सुरेश कोठीया, वय २३ वर्ष रा. वार्ड क्रमांक २ , कुऱ्हा, ता.तिवसा, जि.अमरावती हा तिथे अवैधरित्या देशी दारुची विक्री करतांना आढळुन आला त्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन डचार चाकी वाहन रेनॉल्ट क्विड क्रमांक MH 27 BZ 4378 मध्ये ४ खोक्यामध्ये व ३ प्लॅस्टिक पोत्यामध्ये बॉबी संत्र देशी दारूचे ९० मिली चे प्रत्येकी किंमत ३५ रू. च्या एकूण ७१० काचेच्या बॉटल मिळुन आल्याने कलम 65 (ई) म. दा. का. अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली

तसेच आरोपीचे ताब्यातुन १) रेनॉल्ट क्विड कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक MH 27 BZ 4378 किं.अं. ४,00,000/- ₹ २) देशी दारू बॉबी संत्रा च्या ७१० नग प्रत्येकी ९०ml किंमत २४८५०/- ₹ असा एकूण ४.२४,८५०/-₹ मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील कार्यवाहीकरिता नमूद आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक विशाल आनंद ,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अनुप वाकडे ठाणेदार पोलिस स्टेशन कुऱ्हा पोउपनि विलास थूल,
सफौ प्रमोद ठाकरे, दिलीप सावंत,पोहवा अनिल निंघोट चालक ज्ञानेश्वर देवतळे,पोशि दर्पण बनसोड, सागर निमकर मपोशि राजकन्या शिवणकर यांनी केली आहे.


