हिंगणघाट येथील मोबाईल शॅापी लुटणार्या टोळीतील एकास LCB पथकाने आग्रा येथुन घेतले ताब्यात,मुख्य आरोपी चोरीच्या मोबाईलसह अजुनही फरार…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाट येथील प्रसिध्द मोबाईल दुकानमध्ये शटर तोडुन चोरी करणार्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनासह घेतले ताब्यात,चोरलेले लाखोचे मोबाईलसह मुख्य आरोपी अजुनही बेपत्ता….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तक्रारदार मनिष भिकमचंद लाहोटी रा. जैन मंदिर वार्ड हिंगणघाट यांचे रूबा चौक हिंगणघाट येथे, लाहोटी ब्रदर्स नावाचे मोबाईल दुकान आहे ते दि 22/10/2024  चे  रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे दुकानाचे शटर्सचे लॉक तोडुन आतमध्ये प्रवेश केला व , विवो कंपनीचे एकुण 30 मोबाईल.कि. 5,00,000/-  रू चा माल चोरून नेल्याबाबत, त्यांनी दिलेल्या रिपोर्टवरुन पो.स्टे. हिंगणघाट येथे अप. क्र 1400/2024 कलम 351(4), 305 भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.





सदर गुन्ह्यांचा समांतर तपास स्था.गु.शा. वर्धा करीत होते, तपास दरम्यान तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे व सिसिटिव्ही फुटेजनुसार सदर गुन्ह्यात वापरलेली कार क्र. UP-80/GS-5079 चा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर कार मालकाच्या शोध घेणेकरीता पथक आग्रा उ.प्र. येथे जावुन त्याचा शोध घेतला असता, मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर आरोपी साथीदारांसोबत संगणमताने केल्याचे कबुल केले असुन



सदर गुन्ह्यात त्याचे मालकिची एक WAGON R VXI कार क्र. UP-80/GS-5079 चा वापर केल्याचे व चोरुन नेलेले सर्व मोबाईल त्याचे साथीदारांकडे असल्याचे सांगितले, त्यावरून आरोपी/ कार मालक यशपालसिंग शितलप्रसाद सिंग वय 43 वर्ष, रा. मेहरमपुर तह. फतेहाबाद जि. आग्रा उ.प्र यास ताब्यात घेऊन व गुन्ह्यात वापरलेली एक WAGON R VXI कार क्र. UP-80/GS-5079 कि. 6,00,000/- रू चा माल जप्त करून वर्धा येथे परत आला त्यास हिंगणघाट पोलिसांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे



तसेच यातील मुख्य आरोपी तसेच ईतर साथीदार 1) ईरफान बालु हामी खान 2) जाहिद उर्फ ग्यानी जुहुर खान 3) जमशेद आस मोहम्मद सर्व रा. सालाहेकी, पो.स्टे. सदर तह.जि. जुह- हरियाणा हा अद्यापही फरार असुन त्यास पकडण्याचे स्थानिक गुन्हे शाखा कसोशीने प्रयत्न करत आहे

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पोउपनि प्रकाश लसुंते पोलिस अंमलदार मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, आशिष महेशगौरी, रवि पुरोहित, विनोद कापसे, अभिषेक नाईक, शुभम राऊत, मुकेश ढोके,सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तसेच सायबर सेल चे दिनेश बोथकर यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!