
बॅंकेतील घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा,रोखपालच निघाला सुत्रधार…
जुना मोंढा येथील आदिती अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी बॅंकेतील घरफोडी प्रकरणी तीघांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा केला उघड 18,76,000/- किंमतीची रोख रक्कम व दागिने केले जप्त….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 03/11/2024 रोजी जुना मोंढा, जालना परिसरातील आदिती अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. बुलढाणा, शाखा-जालना येथे बँकचे शटर लॉक तोडुन, लॉकरमधील रु.11,56,000/- रोख रक्कम व रु.19,76,000/- किंमतीचे बँकेच्या ग्राहकांनी तारण ठेवलेले 247 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाल्याची तक्रार बैंक मॅनेजर श्री. प्रकाश आसाराम बाविस्कर, रा. छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 03/11/2024 रोजी दिली. त्यानुसार मॅनेजर यांच्या तक्रारीवरुन सदर बाजार पोलिस ठाणे, जालना येथे घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता


त्याअनुषंगाने दिनांक 03/11/2024 रोजी पोलिस अधिक्षक अजय बन्सल यांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना देण्यात आल्या होत्या तसेच अज्ञात आरोपींचा शोध घेत असतांना बँकेतील काम करणारा कर्मचारी रोखपाल गोवर्धन विष्णु सवडे, वय-22 वर्ष, व्यवसाय-रोखपाल, (कॅशिअर), रा. बाजीउम्रद, ता.जि. जालना याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी करीत असतांना त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने व त्याचे साथीदार 2) लक्ष्मण नारायण डोंगरे, वय-26 वर्ष, व्यवसाय-बैंक लिपीक, रा. मौजपुरी, ता.जि. जालना 3) जगदीश आनंता लोलेवार, वय-21 वर्ष, व्यवसाय- बैंक शिपाई रा. लक्ष्मीनारायणपुरा, जालना व आणखी एक साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

यातील आरोपी गोवर्धन सवडे, लक्ष्मण डोंगरे व जगदीश लोलेवार यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चोरी करण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, तिघांनी संगनमत करुन बँकेमध्ये पाच बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते सदर कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नसल्याने व कर्जाची रक्कम थकीत होत असल्याने सोने तारण कर्ज प्रकरण उघड होवु नये यासाठी त्यांनी बँक फोडण्याचा कट रचला व दिनांक 31/10/2024 रोजी बँकेतील रक्कम व सोने चोरी केले. दिनांक 01/11/2024 रोजी बँकेमध्ये अनार (झाड) फटाका जाळुन लॉकर जाळण्याचा प्रयत्न केला, तसेच बँकेच्या शटरचे लॉक बाहेरुन तोडुन आणुन ते शटरच्या बाहेर ठेवुन बँक फोडल्याचा बनाव केला असल्याची कबुली दिली

तरी सदर गुन्हयातील आरोपी 1) गोवर्धन विष्णु सवडे, वय-22 वर्ष, व्यवसाय-रोखपाल, (कॅशिअर), रा. बाजीउम्रद, ता.जि. जालना 2) लक्ष्मण नारायण डोंगरे, वय-26 वर्ष, व्यवसाय-बैंक लिपीक, रा. मौजपुरी, ता.जि. जालना 3) जगदीश आनंता लोलेवार, वय-21 वर्ष, व्यवसाय-बैंक शिपाई रा. लक्ष्मीनारायणपुरा, जालना यांच्या ताब्यातुन गुन्हयातील रोख रक्कम रु.9,93,000/- व रु.8,86,000/- किं. चे दागिने असा एकुण रु. 18,79,000/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दार्थ बारवाल, भा.पो.से., स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक संदीप भारती, सपोनि, योगेश उबाळे, आनंदसिग साबळे, पोउपनि, शैलेश म्हस्के, स्था.गु.शा.चे पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे, दत्ता वाघुंडे,ईरशाद पटेल, सतिष श्रीवास, आक्रूर धांडगे, देविदास भोजने, व सदर बाजार पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार रामप्रसाद रंगे, जगन्नाथ जाधव, नजीर पटेल, अजीम शेख, दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर, राहुल कटकम, यांनी केली आहे.


