
सहा,पोलिस अधिक्षकांचा जुगार अड्ड्यावर छापा,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
सहा. पोलिस अधीक्षक यांचा जुगार खेळणाऱ्यांवर छापा, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त….
जिंतुर(परभणी)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी अवैध धंद्यांची माहिती घेवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्व उप विभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्याअनुषंगाने दि 01 जानेवारी 2025 रोजी सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, जिंतूर जिवन बेनिवाल, त्यांचे पथक व पो.स्टे. चारठाणा येथे नेमूणकीस असलेले अंमलदार हे देवगांव फाटा परिसरात पॅट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की पो.स्टे. चारठाणा हद्दीत देवगांव ते माळकिनी जाणारे रोडलगत मौजे बोरकिनी शिवारात मुसळे यांच्या शेतातील लिंबाचे झाडाखाली काही ईसम जुगार खेळताय


सदर गोपनीय माहीतीवरुन नमुद ठिकाणी छापा मारून 7 आरोपींना ताब्यात घेतले असून पैसे, मोबाईल, कार व मोटार सायकल असा एकूण 20,93,800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणावरुन 1) मधूकर सुधाकर देशमूख, वय 34 वर्षे, 1. आग्रसेन नगर, मंठा, जि. जालना, 2) भारत अमरसिंग राठोड, वय 44 वर्षे, रा. ठोकसार, ता. मंठा जि.जालना, 3) सुनिल दिगांबर वाघ, वय 51 वर्षे, रा. एकरुखा ता.परतूर, जि. जालना, 4) रामराव अप्पा मुसळे, वय 45 वर्षे, रा. बोरकिनी, ता.सेलू, 5) साहेबराव लक्ष्मण गाडेकर, वय 60 वर्षे, रा. सातोना खु. ता. परतूर, जि.जालना, 6) रवि धर्मू आडे, वय 35 वर्षे, रा.गीरगाव, ता. सेलू, 7) दिनकर बापूराव ताटे, वय 55 वर्षे, रा. गिरगांव, ता. सेलू यांना ताब्यात घेवून त्यांचेवर पो.स्टे. चारठाणा येथे सदर आरोपी व इतर 5 फरार आरोपीतांविरूध्द गु.र.नं 02/2025 कलम 12 अ म.जू.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी,अपर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांचे नेतृत्वात सहा पोलिस अधिक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी जिंतूर जिवन बेनिवाल व त्यांचे पथकाने मिळून केली.



