
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने उधळला दरोड्याचा डाव,शस्त्रासह ११ आरोपी अटकेत,९ गुन्हे केले उघड….
राहुरी (अहमदनगर) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की शनिशिंगनापुर परीसरात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या टोळिचा डाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावला. एटीएम चोरी, दरोडा, जबरी चोरी, मंदिरातील दागिन्यांची चोरी असे ९ गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. दरोडा टाकण्याच्या तयारीत टोळी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने टोळीला जेरबंद केले. तीन वाहनांसह घातक हत्यारे पोलिसांनी जप्त केलेली आहेत
राहुल किशोर भालेराव (रा. वडाळा महादेव, श्रीरामपूर)
संतोष सुखराम मौर्य (रा. फत्तेपूर, उत्तरप्रदेश)


सागर विश्वनाथ पालवे (रा. मेहेकरी, ता. नगर)

बबलू ऊर्फ दानिश शौकत शेख(रा.श्रीरामपूर)

आदिनाथ सुरेश इलग (रा. मोरे चिंचोरे, ता.नेवासा)
रितेश सुरेश दवडे (रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर)
दीपक महादेव साळवे (रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा)
रमेश भाऊसाहेब वाकडे (रा. भोकर, ता. श्रीरामपूर)
प्रीतमसिंह जगदीपसिंह ज्युनी (रा. श्रीरामपूर)
मिलिंद मोहन सोनवणे (रा.हरेगाव, ता. श्रीरामपूर)
अविनाश कारभारी विधाते (रा. घुलेवाडी,संगमनेर)
अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दादा खंडू गांगुर्डे
शिवाजी मिठू शिंदे,
संतोष शेषराव निकम
(तिघेही रा. कात्रड, ता. राहुरी)
हे आरोपी घटनास्थळावरून पळून
गेले. शनिशिंगणापूर परिसरात गुन्हा करण्यासाठी ही टोळी एका
टपरीच्या आडोशाला थांबलेली होती. पोलिसांनी अचानक झडप
घालून अकरा आरोपींना पकडले, तर तिघे अंधाराचा फायदा
घेऊन दुचाकीवररून पळाले.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक राकेश ओला,अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपुर स्वाती भोर,उपविभागिय पोलिस अधिकारी श्रीरामपुर डॅा बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, मनोहर शेजवळ,बाळासाहेब मुळीक, पोलिस हवा दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलिस नायक रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, विशाल दळवी, विजय ठोंबरे, संतोष खैरे, फुरकान शेख, पोलिस शिपाई रणजित जाधव, रोहित मिसाळ, भाऊसाहेबकाळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे, अरुण मोरे यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली.


