
अहमदनगर जिल्ह्यात कत्तलीसाठी डांबली जनावरे अन् पोलिसांवर जीवघेणा हल्ला…
अहमदनगर: कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ती सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जेवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
श्रीगोंदा परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच जनावरांच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर तडीपार आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांनी हल्ला केला. आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. शिवाय, पोलिसांच्या अंगावर चारचाकी वाहन घालण्याचा देखील प्रयत्न झाला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांच्या वाहनाचं देखील मोठे नुकसान झाले आहे.


श्रीगोंदा पोलिसांनी आरोपी नदीम कुरेशी ओंकार सायकर आणि सदन कुरेशी यांना अटक केली आहे. तर अतिक करेशी हा फरार झाला आहे. घटनेबाबत अधिक तपा



