
अवैधरित्या गांजा बाळगणारे पिंजर पोलिसांचे ताब्यात…..
पिंजर पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा बाळगणारे पोलिसांचे ताब्यात,२ आरोपी व १९ किलो ग्रॅम गांजासह ३,८४,३४०/रू किंमतीचा माल जप्त…..
पिंजर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(३०) रोजी चे ९:०० वाजता चे सुमारास सपोनि गंगाधर दराडे, ठाणेदार पोलिस स्टेशन पिंजर यांना माहीती मिळाली की, ग्राम टिटवा तलाव परीसरात एका प्लॅस्टीक पोत्यामध्ये आबंट उग्र वास सदृष गांजा विक्री करीता लपवुन ठेवलेला आहे. मिळालेल्या माहीती वरून पिंजर पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन रेड केली असता आरोपी नामे संतोष गजानन कांबळे वय २७ वर्ष रा. टिटवा हा गांजासह सदर ठिकाणी मिळुन आला. सदर गांजा बाबत त्यास विचारले असता नमुद आरोपीने दिगांबर मारोजी झिंगे वय ३२ वर्ष रा. टिटवा याचे सोबत मिळुन विक्री करीता त्या परीसरात ठेवल्याचे सांगीतले. आरोपी संतोष गजानन कांबळे वय २७ वर्ष रा. टिटवा याचेकडुन १९ किलो ग्रॅम चा गांजा किंमत ३,८४,३४०/- रू किंमतीचा जप्त करून आरोपी १)संतोष गजानन कांबळे वय २७ वर्ष २)दिगांबर मारोजी झिंगे वय ३२ वर्ष दोन्ही रा. टिटवा यांचे विरुध्द अमंली पदार्थ कायदयाअतंर्गत गुन्हा नोंद केला असुन
पुढील तपास करीत आहे.सदरचा माल यांनी कोणाकडून घेतला,आणि तो कोणाचा आहे हे तपासा अंती निष्पन्न होईल


सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापुर, अतिरीक्त प्रभार मुर्तीजापुर गोकुल राज यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि गंगाधर दराडे, पोउपनि बंडु मेश्राम, पोलिस अंमलदार नामदेव मोरे, रोशन पवार,पंकज एकाडे, चालक नागेश दंदी होमगार्ड ज्ञानेश्वर वेरूळकर यांनी ही कारवाई केली.



