महीलेच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिचे दागिणे लुटणार्यांना स्थागुशा पथकाने वर्धा येथुन घेतले ताब्यात,अनेक गुन्हे केले उघड..,

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अकोला येथील महीलेची फसवनुक करणारे ०२ आरोपीस स्थागुशा  पथकाने  ४८ तासाचे आत वर्धा येथुन केली अटक, सदर आरोपी हे वर्धा येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार, अकोला जिल्ह्यातील०३ तर यवतमाळ जिल्हयातील ०१ गुन्हा केला उघड….

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०१/२४ रोजी संध्याकाळी ६ वा चे दरम्यान  श्रीमती मायाबाई राजु खुळे वय ३४ वर्ष रा. गाडगे नगर, अकोला ह्या किल्ला चौका कडुन घरी जात असतांना अनोळखी ईसम त्याचे जवळ येवून म्हणाले की, तुम्ही माझे आई सारख्या आहात पोळा चौकाकडे साड्या वाटप करीत आहे. तुम्ही माझे सोबत चला असे म्हटल्याने त्त्या त्यांचे सोबत गेली असता काल भैरव मंदीराजवळ गल्लीमध्ये अनोळखी ईसमांनी त्यांना गळ्यातील सोन्याचे दागिणे काढायाला सांगितले,त्यांनी तिच्या गळ्यातील दागिने काढून त्यांचे पॉकेट मध्ये ठेवले तेव्हा त्यांच्या पॉकेट मधील नगदी ३०००/-रू व सोन्याची मनी असा एकुण ८०००/- रूचा माल दोन अनोळखी ईसमांनी घेवून गेले अश्या श्रीमती मायाबाई खुळे यांचे तोंडी तक्रारीवरुन
वरून पोलिस स्टेशन जुने शहर अकोला येथे अपराध क्रमाक ८०/२४ कलम ४२०, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद असून तपास सुरु होता





परंतु  सदर घटनेने महिला वर्गात भिती निर्माण झाली होती.
त्याची पोलिस अधीक्षक  बच्चन सिंह यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांना निष्पन्न करण्याबाबत पोलिस निरीक्षक  शंकर शेळके यांना आदेशीत केले असता, स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख यांनी एक
पथक तयार करून तसेच त्यांना मिळालेली गोपनिय माहीतीदार यांचे बाबत मार्गदर्शन करून सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेशीत केले असता, पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे माहीती गोळा केली की सिसिटिव्ही फुटेजमधे ज्या गाडीने ते अनोळखी ईसम आले त्या गाडीचा क्रमांक दिसला त्यावरुन सदर गाडी मालकाचा शोध घेऊन सदरची गाडी ही वर्धा येथील ईसमाचे नावे असल्याचे कळले त्यावरुन पथकास वर्धा येथे रवाना करुन सदर गुन्हयातील ईसम नामे



१) सुरज मिश्रीलाल कंजरभाट वय ३६ वर्ष रा. ईतवारा बाजार पोलिस चौकी समोर वर्धा



२ ) सुनिल ईश्वर नेतलेकर वय ४३ वर्ष रा. ईतवारा बाजार, कंजर मोहल्ला ईतवारा बाजार पोलिस चौकी समोर वर्धा

यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न करून, त्यांना वर्धा येथून ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यातील वाहन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.तसेच वर नमुद आरोपींना  सखोल विचापूस केली असता सदर आरोपी हे अश्या प्रकारे गुन्हे करण्याचे सवयीचे असून त्यांनी मागिल ०५ वर्षा पासून अकोला जिल्ह्यात व इतर जिल्हयात अशा प्रकारे बतावणी करून फसवणूकीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये त्यांनी अकोला जिल्हयात केलेल्या गुन्हयाचे अभिलेखावर पाहणी केली असता त्यामध्ये पोलिस स्टेशन रामदास पेठ अकोला येथील अप नं ४८४/२२ कलम ४२० भादंवि आणि
पोलिस स्टेशन जुने शहर अप नं ३९१ / २२ कलम ४२०, ३४ भादंवि, पोस्टे बाभुळगाव जि. यवतमाळ अप नं ५८० / २२ कलम ४२०, ३४ भादंवि अश्या प्रकारचे दाखल असून त्यांनी सदर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

सदर आरोपीतांची टोळी ही पोलिसांनी पहिल्यांदाच उजेडात आणली आहे. स्थागुशा, अकोला येथील पथकाने सदर गुन्हा घडल्यानंतर गोपनिय बाबतमीदाराकडून सदर गुन्हा उघड आणून आंतरजिल्हा गुन्हे करणा-या टोळीस जेरबंद करण्यात यश मिळविले असून आरोपींना पुढील तपास कामी पोलिस स्टेशन जुने शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अकोला  बच्चन सिंह साहेब, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे,पोलिस निरीक्षक. शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि.  कैलास डी. भगत,
पोउपनि. गोपाल जाधव स्थागुशा. पो. अमंलदार रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीमोद्दीन शेख, एजाज अहेमद, विशाल मोरे, भिमराव दिपके, यांनी केली असून स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे सहकार्य लाभले.
तरी पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, सध्या मकरसंक्रांती  निमीत्याने महिला वर्ग हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी किंमती आभूषने/दागिने परिधान करून जाण्याची प्रथा आहे. त्यासाठी पोलीसांकडून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!