कुख्यात दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक,अनेक गुन्हे केले उघड….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कुख्यात आंतरराज्यीय चैन स्नॅचर(सोनसाखळी चोर)सराईत दरोडेखोरास त्याच्या साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक….

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुख्यात सोनसाखळी चोर(चैन स्नॅचर )





संजय ब्रजमोहन चौकसे रा. तिल्लोर खुर्द, इंदौर, (मध्य प्रदेश),



याचे वर अकोला,अमरावती, मलकापुर, मुक्ताईनगर, भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल.झालेत तर मागील १० वर्षात मध्यप्रदेश मध्ये अनेक जबरी चोरी चे गुन्हे दाखल.आहेत त्याचप्रमाणे
सराईत दरोडेखोर शंकर उर्फ वसीम फुलचंद भदोरीया रा. बुरानपुर छोटी नदी मध्य प्रदेश ह.मु किनखेड चोहटटा बाजार, अकोला



याचेवर गेल्या १२ वर्षात. मध्यप्रदेशात खंडवा,बु-हाणपुर ,ओंकारेश्वर तसेच महाराष्टात , खामगाव, मेहकर, अंजनगाव सुर्जी येथे भा.दं.वि. ३९५ सारखे दरोडयाचे गंभीर गुन्हे दाखल.आहेत  या महिन्यात वरील चैन स्नॅचर सोबत अकोला येथील ०२ चैन स्नॅचींगच्या गुन्हयातही यांचा सहभाग होता
• गुन्हा करतांना जेथे गुन्हा करायचा त्याच ठिकाणचे मोटर सायकल चोरून गंभीर गुन्हयात त्याच मोटर सायकल चा वापर करून नंतर मोटर सायकल सोडुन पळुन जाण्याची पध्दत. गुन्हा करतांना मोबाईल न वापरणे, हेल्मेट परिधान करणे अश्या प्रकारे कोणताच पुरावा मागे न सोडणारे गुन्हेगार अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अथक परिश्रमा नंतर परराज्यातून ताब्यात घेतले

जेल मधुन सुटल्यानंतर १५ दिवसात विविध ठिकाणी एकुण ०४ जबरी चोरीचे गुन्हे तर ०३ मोटर सायकल चोरी चे गुन्हे असे एकुण ०७ गुन्हे केले.यांनी केल्याचे उघड झाले तसेच आरोपीं कडुन अकोला जिल्हयातील केलेल्या सोनसाखळी जबरी चोरी (chain snaching) एकुण ०२ तसेच मोटार सायकल चोरी चे ०३ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ३,५०,००० /- रू चा मुददेमाल हस्तगत, करून अकोला जिल्हयातील ०२ तर मुक्ताईनगर व भुसावळ येथील ०२ जबरी चोरीचे गुन्हे असे एकुण ०४ जबरी चोरीचे गुन्हे तर ०३ मोटर सायकल चोरीचे गुन्हे असे एकुण ०७ गुन्हे एल. सी. बी.च्या पथका कडुन उघड करण्यात आले.तसेचअकोला शहरात दिनांक ०३/०१/२०२४ रोजी मोटार सायकल तसेच सरकारी दवाखाना अकोला येथुन दि.१२/०१/२०२४ रोजी मोटार सायकल चोरी करून चोरी केलेल्या मोटार सायकल वरून ०३/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन खदान हददीतील साई कीराणा दुकान कौलखेड अकोला तसेच दि. १२/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन सिव्हील लाईन हददीतील तोष्णीवाल लेआउट येथील पायी चालणारा वेगवेगळ्या महीलेल्या गळयातुन सोनसाखळी जबरी ने चोरी केल्याचे पो.स्टे. खदान अप क्र १०८/२०२४ कलम ३९२, ३४ भा.द.वी. प्रमाणे तसेच सिव्हील लाईन अप क्र ०५/२०२४ कलम ३९२, ३४ भा.द.वी. येथे
अप क्र. प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते. १० दिवसात झालेल्या ०२ जबरी चोरीच्या गुन्हयाने अकोला शहरात खळबळ उडाली होती. नुतन पोलिस अधिक्षक  बच्चन सिंह,यांनी ह्या घटना गांभिर्याने घेवुन शहरातील पोलिस स्टेशन ला व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पो.नि. शंकर शेळके यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे व जबरी चोरीचे गुन्हे उघकीस आणण्याकरीता मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी स्थानीक गुन्हे शाखा येथील सहा. पोलिस निरीक्षक कैलास भगत, पोउपनि. गोपाल जाधव व त्यांचे पथकातील नापोशि
वसिमोद्दीन पोशि आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, अकोला शहरातील सोनसाखळी जबरी चोरी (CHAIN SNACHING) तसेच मोटार सायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून आदेश दिले. त्याप्रमाणे पथकातील अंमलदार यांनी गुन्हयाचा तांत्रीक व गोपानिय माहीतीचे आधारे अथक परिश्रम करून आरोपींची ओळख पटविण्यात यशस्वी झाले. सदर गुन्हयामध्ये मध्यप्रदेश इंदौर येथील
कुख्यात सोनसाखळी चोर सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने स्था. गु.शा. अकोला येथील एक पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले होते. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याने तेथे ०३ दिवस अथक परिश्रम करून सदर गुन्हयातील चैन स्नॅचर आरोपी नामे

१) संजय ब्रजमोहन चौकसे रा. तिल्लोर खुर्द, इंदौर, ( मध्य
प्रदेश)येथुन ताब्यात घेऊन

२) अभिषेक अनंतीलाल साहु रा. विलास नगर, अमरावती,
३) शंकर उर्फ वसीम फुलचंद भदोरीया रा. बुरानपुर छोटी नदी मध्य प्रदेश ह.मु किनखेड चोहटटा बाजार, अकोला

४) दिपक शंकरराव पानझाडे रा. डाबकी रोड अकोला

यांना ताब्यात घेवून त्यास गुन्हयाबाबत कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता, नमुद आरोपीतांनी अकोला शहरातील १) पो.स्टे
सिव्हील लाईन अप क्र ०५/२०२४ कलम ३९२, ३४ भा.द.वी., २) पो.स्टे खदान अप क ०५/२०२४ कलम ३९२, ३४ भा.द.वी., ३) पो.स्टे सिटी कोतवाली अप क ६७/२४ कलम ३७९ भादवी, ४) पो.स्टे सिटी कोतवाली अप क- ६१/२४ कलम ३७९ भादवी., ५) पो.स्टे रामदास पेठ अप क ३३/२४ कलम ३७९ भादवी असे एकुण अकोला शहरातील ५ गुन्हे केल्याची कबुली देवुन जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर येथील अप क्र. १७/२०२४ कलम ३९२, ३४ भा.दं.वि. चा दिनांक १४/०१/२०२४ रोजी तसेच भुसावळ येथील त्याच दिवशी अप क्र. १४/२०२४ कलम ३९२, ३४ भा.दं.वि. जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. अकोला येथील वरील नमुद सर्व गुन्हातील एकुण ३,५०,०००/- रू चा मुद्देमाल हस्तगत
करण्यात आला असुन गुन्हयात वापरण्यात आलेले चोरीचे वाहने जप्त करण्यात आले आहे. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई कामी पो स्टे सिव्हील लाईन याचे ताब्यात देण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  बच्चन सिंह,अपर पोलिस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला सहापो.नि. कैलास भगत, पोउपनि. गोपाल जाधव, स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार दशरथ बोरकर, फिरोज खान, उमेश पराये, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखडे, मोहम्मद आमीर, वसिमोद्दीन,
अन्सार शेख, स्वप्नील खेडकर, राहुल गायकवाड, सुलतान पठाण, उदय शुक्ला, स्वप्निल चौधरी चालक प्रशांत कमलाकर पो स्टे सायबर चे पोशि आशीष आमले यांनी पार पाडली व मध्यप्रदेश येथील स्था.गु.शा. इंदौर येथील पोलिस शिपाई देवराजसिंग बगेल यांनी मदत केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!