
नुतन पोलिस अधिक्षक यांचा सर्व गुन्हेगारांना मोलाचा सल्ला,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल..
गोवंश तस्करी तसेच महीला सुरक्षा,सार्वजनिक मालमत्ता सुरक्षेला विशेष प्राधान्य,नुतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांचे सर्व ठाणेदारांना निर्देश…
अकोला(प्रतिनिधी) – आज दिनांक ०५/०१/२०२४ रोजी, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलिस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १०.३० वा पोलिस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान पुर्ण जिल्हयाचा गुन्हे विषयक तसेच तुलनात्मक आढावा घेण्यात आला. त्यामध्ये व्हीजीबल पोलिसींग, नाईट गस्ती दरम्यान क्यु आर कोड स्कॅगिंग, सराईत गुन्हेगारावर एम. पी.डी.ए. ,मोक्का कायदया अंर्तगत योग्य प्रतिबंधक कार्यवाही करणे बाबत सुचना देण्यात आल्या, तसेच अवैद्यप्रवासी वाहतुक, फॅन्सी नंबर प्लेट विना हेल्मेट, ट्रिपल सिट, वाहन चालविणारे वाहनचालकाविरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याबाबत तसेच शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय
परिसरातील तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे विरुध्द कारवाही करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
त्यादरम्यान २०२३ मध्ये उत्कृष्ट तपास गुन्हे उकल मुद्देमाल हस्तगत, क्लिष्ट तपास करणारे, डॉरमन फाईल मधील आरोपी अटक, एमपीडीए कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी करणारे, एकुण ७२
पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने पातुर येथील चोरीचे घटनेतील ८० लाखाची चोरी उघड करणारे तसेच पोलिस स्टेशन पिंजर घटनेतील हरवलेल्या मुलाचा व त्याचा खुन झाल्याचा गुन्हा उघड करणारे अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा या सत्कारामध्ये विशेष समावेश होता. जिल्हयात कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्याकरिता तसेच गुन्हे नियंत्रण करण्याकरिता विशेष मोहिमेचे
आयोजन करण्याबाबत सुचना दिल्या. सदर आढावा बैठकीकरिता सर्व विभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच ठाणेदार तसेच सर्व शाखा प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.




