
आंगडीयाचे प्रवासा दरम्यान ८० लक्ष रुपये लंपास…
पातुर(अकोला) प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २६/११/२३ रात्री ९.३० वा चे सुमारास फिर्यादी-
राजू चेलाजी प्रजापती वय २६ वर्ष व्यवसाय आंगडिया सर्व्हींस रा घर क्र 101 गजानन टावर शंकर नगर रोड राजापेठ अमरावती


यांनी पोलिस स्टेशन पातुर येथे तोंडी रिपोर्ट दिला की ते युगा ट्रॅव्हल्स या लक्झरी बस मध्ये प्रवास करीत असताना लक्झरी बस ही पातुर येथील क्वालिटी धाबा येथे थांबली असता फिर्यादी हा लक्झरी बसचे खाली उतरून लघुशंकेसाठी गेला असता व त्यानंतर ढाब्यामध्ये जाऊन फ्रुटी घेऊन परत लक्झरी बस मध्ये आला तेव्हा त्याची बॅग दिसली नाही बॅग मध्ये आंगडिया सर्विस चे वेगवेगळे व्यापारी लोकांचे ८०,०००००/- रुपये व त्याची पर्स ज्यामध्ये त्याचे कागदपत्र ड्रायव्हिंग लायसन्स ,आधार कार्ड, वोटिंग कार्ड ,एटीएम कार्ड दोन व नगदी ६०००/- रुपये होते एकूण ८०,०६०००/- रुपये असे पैसे असलेली बॅग कोणीतरी अज्ञात चोरट्याने लक्झरी बस मधून चोरून नेलेली आहे अशा तोंडी रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन पातुर येथे अप नं- ५३२/२०२३ कलम ३७९ भादवि नुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर शेळके हे करीत आहेत




