
कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…
अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने कोयता गँगकडून पेट्रोलपंप लुटीचे गुन्हे केले उघड…
अमरावती (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, पेट्रोलपंप रॉबरी, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना कर्मचाऱ्याला धाक दाखवून पैसै हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्याला पकडुन त्याच्या साथीदारांसह बाकी पेट्रोलपंप रॉबरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, पोलिस स्टेशन नांदगाव पेठ अमरावती शहर येथे फिर्यादी – शुभम गजानन पांडे (वय 23 वर्षे), रा.शिवणगाव फत्तेपूर यांनी (दि.29फेब्रुवारी) रोजी फिर्याद दिली कि ते व त्यांचा सहकारी निरंजय संजय डिवरे हे भारत तसरे यांचे भारत पेट्रोलपंप शिवणगाव येथे नाईट डयुटी करीत असताना अंदाजे रात्री 11.35 वा.च्या दरम्यान चार इसम एक काळया रंगाची स्प्लेंडर व लाल रंगाचे पल्सर वर पेट्रोल भरण्याकरिता आले व त्यांनी पेट्रोल भरून 500/- रू. दिले. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे परत करते वेळी फिर्यादी यांचे हातातील 7900/- रू. जबरीने धाक दावखून हिसकावून पळून गेले असे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन नादगाव पेठ येथे अपराध क्र.71/2024 कलम 392,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदरचा गुन्हा हा पेट्रोलपंप रॉबरीचा असल्याने व गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त परीमंडळ १ सागर पाटील व सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट कं.1 चे अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने घटना घडल्यापासून सतत प्रयत्न करून परिसरातील सिसीटिव्हि चे फुटेज व गोपणीय बातमीदाराकडून त्यांना माहीती मिळाली कि मंजूळामाता नगर येथे एका इसमाकडे पल्सर गाडी आहे सदर बाबत अत्यंत बारकाईने तपास करून सदर इसमाला ताब्यात घेण्यात आले. सदर इसमाकडे अधिक बारकाईने व तांत्रिक तपास केला असता सदर इसमाने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल करून सदर गुन्ह्यात

1) राहूल लक्ष्मन मूधोळकर (वय 21 वर्षे), व्यवसाय मजूरी रा. मंजूळामाता नगर गुरुकुंज मोझरी अमरावती
2) गौरव महादेवराव पाटील (वय 23 वर्षे) व्यवसाय मजूरी रा.गुरूदेवनगर मोझरी
3) अनिकेत बाळू ठाकरे (वय 20 वर्षे) व्यवसाय गवंडीकाम रा.महोदवपूरा मोझरी
4) आकाश शेडंगे 5) विकास शेडगे 6) प्रतिक माणे 7) राजेश उर्फ राज पूर्ण नाव माहीती नाही अ.कं 4,5,6.7 सर्व रा.हडपसर पूणे यांची नावे सांगितली आहेत. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची पल्सर अंदाजे किं.1,50,000/- रू. व हिरो स्प्लेंडर अंदाजे कि. 80,000/- रू. असा एकूण 2,30,000)- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींची पूर्वपार्श्वभूमी तपासनी असता आरोपी क्र. 4,5,6,7 हे पूणे हद्दीतील हडपसर येथील कुख्यात व सराईत गुन्हेगार व कोयता 1325 गँगचे सदस्य असून आरोपी क्र. 4 व 5 हे गंभीर गुन्ह्यात फरार असून आरोपी क्र. 6 हा हडपसर पोलिस स्टेशन मधून तडीपार असल्याची प्राथमीक माहीती आहे. मोझरी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार कैलास पोहोकार हा एम.पी.डी.ए मध्ये असताना त्यांची आरोपी क्र. 04 यांचेशी कारागृहात मैत्री झाली होती. त्यानंतर दोन महीन्यापूर्वी आरोपी क्र. 04 हा मोझरी येथे आला असता कैलास पोहकार यांनी आरोपी क्र.01 यांचे सोबत त्याची ओळख करून दिली, त्यानंतर आरोपी क्र.01 व 04 यांची फोनवर नेहमी बोलने होत होते.
(दि.28फेब्रुवारी) रोजी दूपारी आरोपी क्र. 04,05,06,07 हे इर्टीगा गाडीने मोझरी येथे आले नंतर आरोपी क्र.01 ते 07 यांनी योजना आखून पोलिस स्टेशन नांदगाव पेठ व अमरावती ग्रामीण हद्दीतील पोलिस स्टेशन तिवसा येथील दोन पेट्रोल पंप रॉबरी केल्याचे प्राथमीक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी क्र.04 ते 07 यांचा शोध घेण्यासाठी अमरावती गुन्हे शाखेची टिम पूणे येथे रवाना करण्यात आली आहे. आरोपी क्र.01 ते 03 यांना पुढील कार्यवाहीसाठी पोलिस स्टेशन नादगाव पेठ पोलिसांचे स्वाधीन करण्याची तजवीज आहे.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त सागर पाटील (मुख्यालय), सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे), शिवाजी बचाटे, सहायक पोलिस आयुक्त (फ्रेजरपुरा विभाग) कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क्र.01 चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खॉन, सतीश देशमुख, नाईक पोलीस अंमलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलीस अंमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, चालक अमोल बाहदरपूरे, भुषन पदमणे, रोशन माहुरे, किशार खेंगरे यानी केलेली आहे.


