घरफोडीच्या गुन्हेगाराच बडनेरा पोलिसांनी शिताफिने केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बडनेरा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला केली अटक…

बडनेरा (अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, बडनेरा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला शिताफीने अटक करून घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमालासह





सॅमसंन रुबीन डेनियल (वय 25 वर्षे) रा.कल्याण वेस्ट, जि.ठाणे



या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 70 हजार 500रु. मुद्देमाल जप्त केला आहे.



पोलिस स्टेशन बडनेरा येथे दि.13 जानेवारी रोजी फिर्यादी  ओमप्रकाश किसनराव इंगोले (वय32 वर्षे) व्यवसाय खाजगी नोकरी राय आशियाना अपार्टमेंन्ट जुनी वस्ती बडनेरा यांनी तक्रार दिली की, फिर्यादी हे दुपारी अंदाजे 12.45 वा दरम्याण माझी आई श्रीमती संध्या इंगोले हि काही कामा निमित्ताने घराला कुलुप लावुन बाहेर गेली व दुपारी 01.30 वा चे दरम्यान घरी परत आली असता तिला घराच्या दरवाज्याला कुलुप दिसुन आले नाही तसेच दरवाजा उघडा दिसला म्हणुन ओमप्रकाश यांने घराच्या आत जाऊन पाहिले असता घरातील बेडरुम मध्ये असलेले दोन्ही कपाट उघडे दिसले त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याने ओमप्रकाश यांचे आईने त्याला  फोन करुन बोलावले असता ओमप्रकाश  यांनी घरात पडलेले सामान व कपाट पाहिले असता त्यात त्याला घरातील  त्यांचे आईचे

1) कानातील सोन्याचे झुमके अं. वजन 7 ग्रॅम चे  अंदाजे किंमत 40,000 रु. चे

2) सोन्याची पुंगळी पोत त्यामध्ये वेगवेगळ्या डिजाईनचे मनी असलेले वजन अंदाजे 4 ग्रॅम चे अंदाजे किंमत 20,000/- रु

3) दोन नग सोन्याचे ओम असलेले लॉकेट अंदाचे वजन 1. 5 ग्रॅमचे अंदाजे किंमत  9000/-  रु. चे व

4) नगदी 50 रु. च्या 30 नोटा 1500रु.

5) पुजेसाठी ठेवलेले चिल्लर 1000रु. असे एकूण 70,500 रु. चा माल दिसुन आला नाही.

तसेच ओमप्रकाश यांचे  घराचे कुलप तोडुन सदर मुद्देमाल चोरुन नेल्यावरुन पोलिस स्टेशन बडनेरा  दि.13 जानेवारी रोजी 8.00 वा.अप क्र. 16/2024 कलम 454,380 भा. द. वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल होता.

सदर गुन्हाचे तपासात घटनास्थळी  राय-आशियाना येथे जावुन सि.सि.टि.व्ही फुटेजचे निरिक्षण केले असता आरोपी चोरी करुन निघुन गेल्याचे सि.सि.टि.व्ही मध्ये दिसुन आल्याने सफौ प्रमोद गुडधे, पोहवा नितिन गावंडे, तसेच डि.बि. पथकातील पोहवा घनश्याम यादव, प्रविंद्र राठोड, प्रविण देंगेकर रामकृष्ण कांगळे, शशिकांत शेळके, महेंद्र वलके, विशाल पंडीत यांनी सदर आरोपीची गोपनीय माहीती घेऊन आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी परत दुसरी चोरी करण्याच्या बेतात असताना त्यास शिताफिने शोधुन ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव

सॅमसंन रुबीन डेनियल (वय 25 वर्षे) रा.कल्याण वेस्ट, जि.ठाणे

असे सांगितल्याने व त्याने चोरी केलेले सोन्याचे दाग दागिणे व रोख रक्कम असे एकूण 70,500 /- रु. चा मुद्देमाल त्याच्या ताब्यात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन अटकेची पुढील कार्यवाही सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कार्यवाही ही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील तसेच सपोआ. कैलास पुंडकर फ्रेजरपुरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितिन मगर सफौ. प्रमोद गुडधे, पो.हवा नितिन गावंडे, तसेच डि.बि. पथकातील पो.हवा घनश्याम यादव, प्रविंद्र राठोड, प्रविण देंगेकर, रामकृष्ण कांगळे, शशिकांत शेळके, महेंद्र वलके, विशाल पंडीत यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!